चाळीसगावात कुष्ठरोग शोध अभियान अंतर्गत रॅली

0

चाळीसगाव – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त न.पा. दवाखाना व आ.बं. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कुष्ठरोग शोध अभियान अंतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीने चाळीसगाव परिसरातील जनतेचे लक्ष वेधून घेतले. कुष्ठरोगविषयी समज, गैरसमज हे विद्यार्थ्यांनी स्लोगन व्दारे व घोषणाव्दारे जनजागृती केली. या कार्यक्रमात न.पा. दवाखान्यातील कार्यालयीन अधीक्षक दीपक पाटील, कुष्ठरोग तज्ञ श्री.चौधरी, तसेच आ.ब. विद्यालयातील मुख्याध्यापक वि.वा. निरखे यांच्या मार्गदर्शनाखाली संजयकुमार सोनवणे, दिलीप शिंदे, कुणाल पाटील, चित्रकार कवी दिनेश चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.