कुस्ती स्पर्धेत २०० पेक्षा अधिक जोड्या सहभागी
चाळीसगाव- श्री रघुवीर व्यायामशाळा व कै. कोंडाजी वस्ताद यांचेवतीने प्रकाशझोतामध्ये कुस्त्यांची दंगल आयोजीत करण्यात आली होती. यात २०० पेक्षा अधिक जोड्यांनी सहभाग घेतला.
गुडीपाडवा निमित्त आयोजित भव्य कुस्ती सामन्यांना मल्लांसह कुस्तीप्रेमींचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यात जळगाव, धुळे, हरियाणा, औरंगाबाद, नाशिक ,अहमदनगर, मनमाड आदि ठिकाणचे मल्ल सहभागी झाले होते. अँग्लो उर्दू हायस्कुलच्या पटांगणावर कुस्ती सामन्याचं आखाडा पूजन चा.ए. सोसायटी चे चेअरमन नारायण अग्रवाल, रघुवीर व्यायाम शाळेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल यांचे हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी आ. राजीव देशमुख होते. यावेळी प्रदीप देशमुख, भोजराज पुंशी, वसंत चंद्रात्रे, श्यामसुंदर शुक्ल, प्रफुल्ल साळुंखे, मंगेश पाटील, प्रमोदबापू पाटील, रामचंद्र जाधव, भगवान पाटील, शाम देशमुख, आर.एल. पाटील, सुनील देशमुख, ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, अण्णा कोळी, रमेश चव्हाण, नाना कुमावत,दिलीप घोरपडे, संजय सोनार,दीपक पाटील, शिवाजी राजपूत, अॅड. प्रदीप अहिरराव, संजय पवार, नथु चौधरी पैलवान, गफूर पैलवान, प्रभाकर चौधरी, बापू अहिरे, योगेश अग्रवाल, जुगल अग्रवाल, अक्षय अग्रवाल,मधुर अग्रवाल, राजेंद्र अग्रवाल,मयूर अग्रवाल,मिलिंद देशमुख, पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड,साहाय्यक पोलीस निरीक्षक रोही यांचेसह शहर व ग्रामीण पो.स्टे. चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
असे आहेत विजयी पैलवान
गोकुळ साबळे चाळीसगाव, मोहसीन रांजणगाव, रितेश नगरदेवळा, राहुल आगोणे भोरस, दिनेश गायकवाड, भिला आगोने, सुरेश गायकवाड, संजय देशमुख, सुभाष गायकवाड यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन रमेश जानराव, प्रा.रमेश आवटे, बी.बी.सोनवणे, रमेश रोकडे, प्रा.एम.बी.लाड यांनी केले. शंभर रूपयापासून ते सात हजार रुपयापर्यंत रोख रक्कम इनाम विजयी मल्लांना देण्यात आले.