चाळीसगावात कोरोनाचा कहर

चाळीसगाव: शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. शासकीय ट्रामा केअर सेंटर रूग्णालयात उपचारादरम्यान दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले असून शहराची वाटचाल ही हॉटस्पॉट शहराकडे होत आहे. कोरोना बाधीतांना येथील शासकीय ट्रामा केअर सेंटर अर्थात कोव्हीड रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले जाते. मात्र उपचार सुरू असलेल्या दोन जणांचा उपचारादरम्यान दि.२४ मार्च रोजी सायंकाळी मृत्यू झाला. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. दि.२४ मार्च रोजी सायंकाळी पर्यंत एकूण कोरोना बाधीतांची संख्या हि ५९ इतकी होती. कोरोनाचा फैलाव अधिक होऊ नये म्हणून नगरपालिका व महसूल प्रशासनाने कंबर कसली असून नियमांचे काटेकोर पालन करा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.