चाळीसगावात खेडी व खेडगाव येथील शेतकर्‍यांचे आमरण उपोषण

0

चाळीसगाव । तालुक्यातील खेडगाव परिसरातील नारळी नारळी नदीवरील पाटाला पाणी मिळावे यासाठी परिसरातील 20 शेतकरी येथील तहसिलदार कार्यालयासमोर 10 जानेवारी 2018 रोजी सकाळपासून आमरण उपोषणास बसले होते दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास आमदार उन्मेश पाटील यांनी जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधुन 11 रोजी पाटाला पाणी सोडण्याचे आश्‍वासन दिल्यावर उन्मेश पाटील यांच्या हस्ते निंबु पाणी देवुन शेतकर्‍यांनी आमरण उपोषण मागे घेतले आहे. तहसिलदार कार्यालयासमोर सकाळपासून आमरण उपोषणाला बसले होते.

अधिकार्‍यांचे वारंवार दुर्लक्ष
तालुक्यातील खेडी व खेडगाव परिसरात व ईतर भागात पाटाचे पाणी येवुन राजकीय व्यक्तींनी स्वहितासाठी स्वतःचे लाभक्षेत्र ओले करुन घेतले. मात्र नारळी नदीवरील शेतकरी पाटाच्या पाण्यापासुन वंचीत राहुन पशुधनाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश निर्माण होवुन लिंबु बागा धोक्यात आल्या. वेळोवेळी लोकप्रतिनिधी व पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांना विनवण्या करुनही आश्‍वासनाव्यतिरीक्त काही हाती पडले नाही. म्हणुन खेडी खु व खेडगाव परिसरातील शेतकरी किशोर साळुंखे, मन्साराम माळी, दत्तात्रेय माळी, भैय्यासाहेब अहिरराव, साहेबराव साळुंखे, पंढरीनाथ महाजन, विठ्ठल महाजन, द्न्यानेश्‍वर माळी, प्रवीण टिळकर, गोविंदा माळी, दगा माळी, वसंत साळुंखे, परमेश्‍वर माळी, सखाराम माळी, गव्हरलाल जाने, पांडुरंग महाजन, ईस्माईल तांबोळी, सुनिल माळी, रघुनाथ माळी, खंडा माळी, नाना माळी व परमेश्‍वर रावते हे शेतकरी पाटाला पाणी सोडावे.

यांची होती उपस्थिती
आमदार उन्मेश पाटील, पंचायत समिती सभापती स्मितल बोरसे, तससिलदार कैलास देवरे यांनी उपोषणस्थळी येवुन आमदार उन्मेश पाटील यांनी भ्रमणध्वनीवरुन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जळगाव यांच्याशी चर्चा करुन परिस्थितीची माहिती दिली. पाणी सोडण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आमदार उन्मेश पाटील यांनी सकाळी पाणी सोडले जाईल, असे आश्‍वासन देवुन त्यांच्या हस्ते उपोषणकर्ते शेतकर्‍यांना निंबु पाणी दिल्यावर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी भाजपचे दिनेश बोरसे, पं.स.सदस्य भाऊसाहेब पाटील, सुभाष पाटील, धनंजय मांडोळे, दिनेश वाघ, जितु वाघ, नरेंद्र जैन आदी उपस्थित होते.