चाळीसगावात घंटागाड्या सुरू

0

चाळीसगाव । चाळीसगाव शहरातील घंटागाड्यांच्या निविदेला विरोध करून विरोधकांनी जनतेपुढे कचरा समस्येचा डोंगर उभा केला आहे, मात्र जनतेने दिलेल्या शब्दाला जागून आज आमदार उन्मेश पाटील यांनी स्वखर्चातून शहरात 22 घंटा गाड्यांचा कचरा संकलनासाठी शुभारंभ करण्यात आला. या वाहनांच्या माध्यमातून पहिल्याच दिवशी कित्येक टन कचरा संकलित झाल्याने जनतेची कचर्‍याच्या समस्येतून सुटका झाली आहे. त्यामुळे शहरात आमदारांनी स्वखर्चातून राबविलेल्या या उपक्रमाचे शहरवासियांकडून कौतुक होत आहे. या उपक्रमाचा आज सकाळी 6 वाजता नगरपरिषदेच्या प्रशासकीय कार्यालयाच्या आवारात गटनेते राजेंद्र चौधरी यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

कचरा घंटागाडी वापर करण्याचे नागरीकांना आवाहन
यावेळी बोलताना आरोग्य सभापती घृष्णेश्‍वर पाटील यांनी सांगितले की, विरोधकांनी दळभद्री राजकारण करत घंटागाडीच्या निविदेला विरोध करून शहराला घाणीत लोटण्याचे पाप केले आहे. ज्या विश्‍वासाने चाळीसगावकरांनी वर्षानुवर्ष शहर विकास आघाडीला सत्ता दिली त्यांच्याशी एकप्रकारे प्रतारणा त्यांनी केली आहे.

नागरिकांना आवाहन
आज ही समस्या दिवसेंदिवस रुद्ररूप धारण करीत आहे. याला सर्वस्वी विरोधक कारणीभूत असून जनतेला अधिक त्रासाला सामोरे जावू नये म्हणून आज आमदार उन्मेश पाटील यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यानिमित्ताने जनतेला सेवेचा दिलेला शब्द आमदार महोदयांनी पाळला आहे. याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. लवकरात लवकर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून घंटागाडीची निविदा पूर्ण केली जाणार आहे. मात्र तोपर्यंत या घंटागाड्या सुरु राहणार असल्याचे सांगितले. जनतेच्या सेवेसाठी या घंटागाड्या नियमित कचरा संकलन करणार असून नागरिकांनी या घंटागाड्यांचा उपयोग करावा, असे आवाहन नगराध्यक्षा व नगरसेवकांनी केले आहे.

यांची होती उपस्थिती
यावेळी नगराध्यक्षा आशालता विश्‍वास चव्हाण यांच्यासह पालिकेचे आरोग्य सभापती घृष्णेश्‍वर पाटील, विश्‍वास चव्हाण, महिला बालकल्याण सभापती विजयाताई भिकन पवार, बांधकाम सभापती विजयाताई प्रकाश पवार, नगरसेवक संजय पाटील, मानसिंग राजपूत, अरुण अहिरे, चंद्रकांत तायडे, सोमसिंग राजपूत, बबन पवार, भास्कर पाटील, गणेश महाले, सारंग जाधव, कुंदन जाधव, यांच्यासह 22 घंटा गाड्यांचे चालक उपस्थित होते.