चाळीसगावात घरफोडी; 5 लाख लांबविले

0
प्रभू रामचंद्र नगरातील घटना; श्‍वान पथकाचे पाचारण  
चाळीसगाव – प्रभु रामचंद्र नगरातील एस.डी. महामंडळाचे कर्मचारी रविंद्र नामदेव खैरनार यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी े 1 लाख रूपये रोख व 14 ते 15 तोळे सोन लंपास केल्याची घटना 12 ऑगस्ट चे रात्री 8 ते सकाळी 7 वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे  परिसरात खळबळ उडाली असून असून पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुटुंब देवदर्शनासाठी गेलेले असताना चोरी 
याबाबत अधिक माहीती अशी की धुळे रोड येथील प्रभु रामचंद्र नगरात रविंद्र नामदेव खैरनार हे गेल्या अनेक वर्षापासून रहिवास करून आहेत. ते देवदर्शनासाठी कुबेर येथे गेले असता त्यांच्या घराचा अनाधिकाराने घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. या घरात ते भाडेकरून म्हणून राहत आहेत. घरा जवळच स्वत:च्या घराचे बांधकाम सुरू असल्याने घरात रोख रक्कम आणून ठेवली होती. घर बांधकामाचे पैसे गेल्याने परिसरात हादरल्याचे दिसून आले. दि. 12 रोजी रात्री 8 ते सकाळी 7 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरातील सामान अस्तव्यस्त करून कपाटातील 14 ते 15 तोळे सोने व रूपये 1 लाख रोख अशी सुमारे 5 लाख रूपयाचा ऐवजा लंपास केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी नजीर शेख, शहर पोलीस निरीक्षक रामेश्‍वर गाडे पाटील यांच्या पथकाने भेट दिली. चोरट्यांचे हाताचे ठसे तज्ञांनी घेतले असून श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. या प्रकरणी चाळीसगांव शहर पोलीस ठाण्यात रविंद्र खैरनार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.