Anger at being shocked while walking: A young man was hit with a brick, an iron rod put on his head चाळीसगाव : चालतांना धक्का लागल्याच्या रागातून दोघा भावांनी तरुणाला मारहाण करीत वीट मारली तसेच डोक्यात लोखंडी रॉड टाकला. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांविरोधात गुन्हा
रोहित भिकन शिरसाठ (21, अण्णाभाऊ साठे नगर, स्टेशन रोड, चाळीसगाव) हा तरुण आपल्या परीवारासह वास्तव्याला असून मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतो. मंगळवार, 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास रोहित हा त्याच्या घराजवळून जात असतांना नंदू भास्कर शिरसाठ याला चालतांना धक्का दाखला. याचा राग आल्याने नंदू शिरसाठ आणि बजरंग नंदू शिरसाठ या दोन्ही भावांनी रोहित याला लोखंडी रॉडने डोक्यावर मारहाण केली तर दुसर्याने तोंडावर विट फेकून मारली. यात रोहित हा जखमी झाला. त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्याच्या जबाबावरून संशयीत आरोपी नंदू भास्कर शिरसाठ आणि बजरंग नंदू शिरसाठ (दोन्ही रा. अण्णाभाऊ साठे नगर, चाळीसगाव) यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार किशोर सोनवणे करीत आहे.