चाळीसगावात छिंदमच्या वक्तव्याचा निषेध

0

शहर पोलीस स्थानकासमोर जोडा मारो आंदोलन

चाळीसगाव । शिवाजी महाराज यांच्याविरोधात अपशब्द वापरणा नगरचा उपमहापौर छिंदमच्या प्रतिमेला आज 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता चाळीसगाव पोलीस स्टेशन समोर शिवप्रेमींच्या वतीने जोडा मारो आंदोलन करण्यात आले व त्याच्याविरोधात गुन्हा दाखल होईपर्यंत शहर पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी पोलिस स्थानकाच्या समोर शिवरायांविरोधात अपशब्द बोलण्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.