चाळीसगाव । जेसीआय चाळीसगाव सिटीतर्फे शनिवारी 9 रोजी स्व.नानकीबाई प्यारेलाल पुन्शी यांचे स्मरणार्थ प्रायोजीत जेसी सप्ताह 2017 अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय विद्यालयात हि स्पर्धा पार पडली. यास्पर्धेत 340 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष भोजराज पुन्शी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याकरीता जेसीआयच्या उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाला बालाप्रसाद राणा, राज पुन्शी, प्रसन्न अहिरे, आशुतोष खैरनार, धर्मराज खैरनार, देवेन पाटील, संजय पवार, मुराद पटेल, साहील दाभाडे उपस्थित होते.