चाळीसगावात जैन तिर्थ प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन

0

चाळीसगाव । श्री कच्छीदशा ओसवाल जैन समाज संचलित तिर्थ नायक देवाधिदेव, श्री. पद्मप्रभस्वामी श्री संभवनाथ स्वामी, श्री पद्मप्रभस्वामी आदी देवांच्या प्रतिमा येथील नविन मंदीरात सिहांसन व मुर्तीच्या भव्य स्थापना अशा 3 दिवसीय महोत्सवात 15 ते 17 फेब्रुवारी 2017 या दरम्यान होणार आहे. या कार्यक्रमासाठी संपुर्ण भारतातून अतिथी चाळीसगावी येणार असून सदर जागृत तिर्थस्थळ दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन कच्छी दशा ओसवाल जैन समाज अध्यक्ष मनीष शाह व सचिव इंद्रेश शाह यांनी केले आहे. प्राचीन तिर्थांपैकी एक जागृत तिर्थस्थळ महाराष्ट्रातील चाळीसगाव येथे असल्याने भाविकांची संख्या वाढू लागली. चाळीसगाव येथून जवळच जैनांचे प्राचीन तिर्थ बलसाना हे आहे. याठिकाणी भाविक दर्शनासाठी येतात. सदर नविन देव देवी सिंहासन यांचे चाळीसगाव नगरीत भव्य प्रवेश शोभायात्रेचे आयोजन 6 फेब्रुवारी 2017 रोजी करण्यात आले होते.

संपुर्ण शहरात प्रसादाचे वाटप: यावेळी संपुर्ण शहरात प्रसादाचे वाटप होऊन हजारोच्या संख्येने भाविकांनी दर्शन घेतले होते. यामध्ये प्रदीपदादा देशमुख, राजेंद्र चौधरी, जैन समाजचे अध्यक्ष पारसमल जैन, संदेश टाटीया, राजू बागरेचा, राजू पटणी, संदीप जैन, नरेश दोशी, विजय चोप्रा, संजय टाटीया तसेच जैन समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. मंदीर जीणोध्दार व महोत्सवासाठी विशेष परिश्रम मनिष शाह, निशांत मोमाय, इंद्रेश शाह, धनपती रतानी, दलेश मोमाया, दिपक लोडाया, राजेंद्र लोडाया, किशोर धुल्ला, राजेश शियाड, तेजस लोडाया, चंद्रेश लोडाया, अंकीत धुल्ला, कपील लोडाया, भावेश मोमाया, किरण लोडाया, कुलिनकांत शाह यांनी घेतले. तर या कार्यात रेखा मोमाया, तलोत्तमा लोडाया, दिपा शाह, भावना लोडाया, ज्योती लोडाया, शिल्पा लोडाया, भक्ती लोडाया, स्नेहा मोमाया आदी जैन समाज महीलानी परीश्रम घेतले.