चाळीसगाव । चाळीसगाव शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली असुन शहर वाहतुक पोलीस प्रयत्न करुन देखील यावर आळा बसत नसल्याचे दिसत आहे असाच काहीसा प्रकार सोमवारी 15 मे 2017 रोजी घडला 11 वाजेपासुन जवळपास दीड तास शहरातील सिग्नल पॉइंटवर खोळंबा झाला होता. त्याठिकाणी फक्त 2 पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असल्याने त्यांची वाहतुक सुरळीत करण्यासाठी मोठी कसरत झाली. चाळीसगाव शहरात वाहनांचे प्रमाणमोठ्या प्रमाणावर वाढले आहे काही दुकानदारांनी दुकानापुढे अतिक्रमण केले तर काही काँपलेक्सला वाहनतळ नसल्याने ग्राहकांची वाहने रस्त्यावर लागतात व हातगाडीवर फळ, भाजीपाला ईतर वस्तु विक्री करणारे तसेच अवजड वाहनांना शहरातुन जाण्यास मनाई असतांना देखील ते शहरातुन जात असल्याने चाळीसगाव शहरात वहतुकीचा मोठा खोळंबा होत आहे.
सुरळीत करण्यासाठी मोठी कसरत
असाच काहीसा प्रकार आज 15 रोजी शहरातील सिग्नल चौकात घडला सकाळी 11 वाजेच्या सुमारास अचानक वाहतुकीचा खोळंबा झाला व अर्धा तास त्याठिकाणी फक्त 2 पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असल्याने त्यांची वाहतुक सुरळीत करण्यासाठी मोठी कसरत झाली. शहरात वाहतुकीची मोठ्याप्रमाणावर कोंडी होत असताना वहतुक पोलीसांची शहराबाहेर एवढी गरजच काय त्यातील काही पोलीस शहरात तैनात केल्यास वाहतुक कोंडीवर नियंत्रण बसेल अशी मागणी होवु लागली आहे.
वाहतूक पोलिसांचे लक्ष नसल्याची वाहनधारकांची खंत
सिग्नल चौकात सिग्नल यंत्रणा बंद असल्याने कोणतीही वाहने मिळेल तो मार्ग काढतात म्हणुन येथे व गणेश रोड, शनी मंदीर ते जुनी नगरपालिका व घाटरोड वर नेहमी वाहतुक जाम होते. त्यामुळे याठिकाणी नेहमी छोटे अपघात देखील होतात. याकडे मात्र शहर वाहतुक पोलीसांचे लक्ष असल्याचे दिसत नाही. काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात प्रयत्न केले जात असल्याचे दिसुन येते. पण शहराच्या बाहेर कन्नड रोड, औरंगाबाद धुळे बायपास वर मोठ्या प्रमाणावर शहर वाहतुक पोलीस गस्त घालतांना दिसतात. कन्नड धुळे चौफुली, धुळे मालेगाव औरंगाबाद चौफुली याठिकाणी व टोलनाक्याजवळ वाहतुक पोलीसांचा जत्था मोठ्या प्रमाणावर दिसतो व वाहनांची तपासणी केली जाते. खरे पाहता शहरात वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणावर शहर वाहतुक पोलीसांची गावाबाहेर मोठ्या प्रमाणावर गरजेचे आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.