चाळीसगावात दोन ठिकाणी चोरी

0

चाळीसगाव । शहरातील मालेगाव रोडवर दोन ठीकाणी चोरी झालीची घटना घडली अ‍ॅटो पार्टस्सह मेडीकल स्टोर्सचे सटर वाकवून गल्ल्यातील रोख रकमेसह 7 हजाराचा ऐवज लांबविल्याची घटना 23 व 24 च्या रात्री घडली असून चाळीसगाव शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने 24 सप्टेंबर रोजी पहाटे 5 ते 8 वाजेदरम्यान शहर व ग्रामीण भागातील काही ठिकाणी कोंबीग ऑपरेशन राबवून वारंटमध्ये करार असलेल्या 11 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हेगार शोधण्यासाठी त्याचप्रमाणे गुन्ह्यातील फरार आरोपी त्याचप्रमाणे कायद्या सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून यासह वारंटमध्ये फरास असलेले आरोपी शोधण्यासाठी कोबींग ऑपरेशन राबविण्यात येते.

कोबिंग ऑपरेशन वारंटमधील आरोपी अटकेत
चाळीसगाव । चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने 24 सप्टेंबर रोजी पहाटे 5 ते 8 वाजेदरम्यान शहर व ग्रामीण भागातील काही ठिकाणी कोंबीग ऑपरेशन राबवून वारंटमध्ये करार असलेल्या 11 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हेगार शोधण्यासाठी त्याचप्रमाणे गुन्ह्यातील फरार आरोपी त्याचप्रमाणे कायद्या सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून यासह वारंटमध्ये फरास असलेले आरोपी शोधण्यासाठी कोबींग ऑपरेशन राबविण्यात येते. 24 सप्टेंबर 2017 रोजी चाळीसगाव शहरात पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक आदीनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि संजय पंजे, युवराज रबडे, सफौ देवरे, हवलदार बाबूराव भोसले, शशिकांत पाटील, मिलींद शिंदे, अविनाश पाटील, पो.कॉ.बापू पाटील, संदीप जगताप, गोपाल बेलदार, भगवान माळी, महिला पोलिस कॉन्स्टेबल शितल भालेराव, सोनी तडवी यांनी चाळीसगाव शहरातील विविध भागात त्याप्रमाणे शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील तालुक्यातील ओझर, टाकळी प्र.चा., खरजई या गावात कोबिंग ऑपरेशन राबवून पाहटे 5 ते 8 वाजेदरम्यान वारंटमध्ये फरार असलेले आरोपी शंकरराव देशमुख, संभाजी पाटील, दिनेश विसपूते, मनोज मांडगे, साहेबराव चौधरी, बाळू गुंजाळ, गोपाल गोयर, सर्व राहणार चाळीसगाव तसेच गौतम जाधव (ओझर), अमोल पाटील (टाकळी), रतन दोधा एरंडे (खरजई), सर्व तालुका चाळीसगाव यांच्यासह शहरातील वृंदावन कॉलनी परीसरातील एक महिलेला ताब्यात घेतले आहे.

वाढत्रा चोर्‍यांमुळे भीतीचे वातावरण
शहरातील मालेगाव रोडवरील नयन विजयकुमार ब्रन्हेचा (30, रा.शिवदर्शन कॉलनी, धुळे रोड)यांचे जनसेवा मेडीकलचे शटर वाकवून गल्ल्यात ठेवलेले 6 हजार रूपये रोख व 1 हजार रूपयाची औषधी अज्ञात चोरट्याने 23 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर रोजी पहाटे 6 वाजे दरम्यान चोरून नेले आहे. त्याच रात्री शेजारीच असलेल्या उज्ज्वल अ‍ॅटोस्पार्ट या दुकानाचे कुलूप तोडून दुकानातून 800 रूपये चोरून नेले तर त्याच परीसरात असलेल्या आनंद अ‍ॅटो पार्टस,गुरूकृपा स्पेअर्स पार्ट या दुकानाचे देखील आरोपींनी कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. संदीप तहसीलदार करीत आहे. मागील महिन्यात देखील चोरी करण्याचा प्रयत्न केला गेला होता. शहरात वाढत्या चोर्‍यामुळे शहरात भीतीचे वातावरण झाले आहे.