चाळीसगावात धुमस्टाईलने 1 लाख 90 हजार रोकड लंपास
चाळीसगाव । शहरातील डेअरी रोडवरील हॉटेल मनोरमाच्या मागे राहणारे रहिवाशी यांनी शेतीचा व्यवहार झाल्यानंतर पैसे भरणा करण्यासाठी बँकेत जात असतांना जास्त रक्कम असल्याने भरणा करता न आल्याने घराजवळ अज्ञात चोरट्यांना मोटारसायकलवर मागून येवून धुमस्टाईने एक लाख 90 हजार रूपयांची रोकड लंपास केल्याची घटना आज घडली असून अज्ञात चोरट्यांविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डेअरी रोडवरील हॉटेल मनोरमाच्या मागे राहणारे रहिवाशी प्रविण दिनकर पाटील (37) हे घनसोली मुंबई येथील रिलायंन्स रिटेल लिमिटेड कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहे. त्यांचे आईवडील चाळीसगाव येथे राहत असल्याने त्यांनी शेती विक्री काढली होती. त्यानुसार त्यांनी शेती विकून 1 लाख 90 हजार रूपये बँकेत भरणा करण्यासाठी स्टेशन रोडवरील एचडीएफसी बँकेत गेले असता बँकेत सॅलरी अकाऊंट असल्याने त्यांना एकरकमी एवढी रक्कम भरण्यास बँकेने नकार दिला. त्यानंतर ते पैसे घेवून पुन्हा घरी निघाले. घराजवळ असल्यानंतर मागून येणार्या (4930 पुर्ण नंबर माहित नाही) मोटारसायकलवर दोघांपैकी मागे बसणार्याने मागून पिशवीला जोरदार झटका घेवून धुमस्टाईलने पैशांची पिशवी घेवून निघून गेले. प्रविण पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.