चाळीसगाव शहरात पाच ठिकाणी केल्या बोअरिंग
नगराध्यक्षांच्या कामाचे नागरिकांकडून कौतुक
शौचालय स्वच्छ राहण्यासाठी केली पाण्याची व्यवस्था
चाळीसगाव- शहरातील झोपडपट्टी परिसरातील शौचालयांच्या मध्ये पुरेशा पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी वेगवेगळ्या मोठ्या नागरी वस्ती बहुल भागात प्रसाधनगृह शेजारी नवीन पाच कूपनलिका खोदण्यात आल्या असून त्यावर जलपरी बसून मुबलक पाणी शौचालयाचा वापर करणार्या नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे या उपक्रमाची नागरिकांकडून कौतुक केले जात आहे
मुबलक पाण्यासाठी उपाययोजना
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाशेजारी, सदानंद हॉटेल समोरील कुरेशी वाडा, दोस्त चित्र मंदिरासमोरील शौचालय संजय गांधी नगरातील शौचालय, तसेच पावर हाउस रोड भिमनगर येथील महिला स्वच्छता गृहाभोवती या पाच कुपनलिका खोदण्यात आल्या असून त्यावर जलपरी बसवून शौचालयांचा वापर करणार्या नागरिकांसाठी मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, याकरिता मोठ्या प्रमाणात पाणीसाठा करण्याचे नियोजन पालिकेने आरंभिले आहे.
कामाचा शुभारंभ
या कूपनलिकां खोदण्याचे कामाचे व विविध कूपनलिकांच्या शुभारंभ कार्यक्रम नुकताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाशेजारी करण्यात आला. सुरवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उद्यानातील पुतळ्याला पुष्पहार घालून व कूपनलिकेच्या ठिकाणी श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी चाळीसगाव नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष आशालता चव्हाण राष्ट्रीय विद्यालयाची ज्येष्ठ संचालक विश्वासराव चव्हाण पालिकेचे युवा नगरसेवक रामचंद्र जाधव सामाजिक कार्यकर्ते गौतम जाधव, पालिकेचे पाणीपुरवठा मुख्य अभियंता संजय अहिरे, पालिकाअभियंता अमोल चौधरी, पाणीपुरवठा कार्यालय व्यवस्थापक दिपक देशमुख, कैलास नागणे, अमोल आहरे, वाल्मीक सोनवणे, संजय मोरे, नितीन शिरसाट यांच्यासह पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील
शहरातील मोठ्या नागरी वस्ती बहुल भागात अत्याधुनिक सुलभ शौचालयांची निर्मिती करण्यात आली आहे. या स्वच्छतागृहाचा मोठ्या प्रमाणावर नागरिकांकडून वापर केला जातो, त्यासाठी पालिकेने अनेकदा जनजागृती अभियान राबवले आहे. येथे येणार्या नागरिकांना शौचालयाचा वापर करताना पाण्याचा तुटवडा भासू नये याकरिता तातडीने या पाच बोरिंग करून त्यावर जलपरी बसण्याची नियोजन केले आहे. अधिकाधिक पाणी मिळाल्यास शौचालयाचा वापर करण्याची नागरिकांमध्ये अधिकाधिक गोडी निर्माण होईल, अशी अपेक्षा पालिकेच्या नगराध्यक्ष आशालता चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली.