चाळीसगाव- वसुंधरा फाउंडेशन चाळीसगावतर्फे बालगोलांसाठी चित्रकार धर्मराज खैरनार यांच्या मार्गदर्शनात कै.सौ.सुवर्णाताई उद्यानात पर्यावरण पूरक आकाश कंदील कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले. मंचावर डॉ. उज्वला देवरे, वसुंधरा फाउंडेशनच्या अध्यक्ष धरती सचिन पवार, ज्योती मोरे, देवेन पाटील, धर्मराज खैरनार, सादिक शेख, योगेश कोठावदे, रुपाली चौधरी, अमोल येवले, सागर मोरे, अमोल रोजेकर, तेजल नानकर, मनोज पाटील मंचावर उपस्थित होते. कार्यशाळेची सुरवात स्व.केकी मुस यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी डॉ.उज्वला देवरे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत दिवाळीत बाजारात मिळणार्या प्लास्टिकपेक्षा आपल्या पाल्याने साकारलेला आकाशकंदील घरासमोर लावल्याचा अधिक आनंद होईल. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये कलेविषयी आदर वाढेल. दिवाळीला आवश्यक असणार्या आकाशकंदिलाचे महत्त्व जाणून घेत त्याची पर्यावरणाशी सांगड घालण्याचा प्रयत्न या उपक्रमाद्वारे केला जात असल्याचे प्रास्ताविक चित्रकार धर्मराज खैरनार यांनी केले. सौ धरती पवार प्लास्टिकचे अनेक दुष्परिणाम पाहता पर्यावरण पूरक आकाश कंदीलच सर्वांनी वापरावेत, यासाठी जनजागृती करण्याचा मानस व्यक्त केला.
कार्यशाळेत बनवले 210 पर्यावरणपूरक आकाशकंदील
कार्यशाळेत पर्यावरणपुरक आकाशकंदील कसा तयार करायचा या विषयी प्रात्यक्षिक व मार्गदर्शक कलाशिक्षक धर्मराज खैरनार, सादिक शेख, योगेश कोठावदे, रुपाली चौधरी, अमोल येवले, सागर मोरे, अमोल रोजेकर, तेजल नानकर यांनी कागदापासून अतिशय सहजरीत्या वेगवेगळ्या आकाराचे आकाश कंदील बनवण्यास शिकवले. चौकोनी, गोलाकार, चांदणी अशा विविध आकाराचे आकाश कंदील बनवून विद्यार्थ्यांनी स्व-निर्मितीचा आनंद घेतला. शिबिरात विद्यार्थ्यांनी 210 पर्यावरण पूरक आकाश कंदील बनवून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला. यावेळी प्रशांत चौधरी, प्रमोद शिंपी, दिपक देशमुख, खुशाल पाटील,योगेश माळी,सुजित पाटील,मनोज पाटील,बापूसाहेब खैरनार,महेंद्र जाधव ,निलेश काकडे, नरेंद्र शिरोडे ,साहिल दाभाडे,कमलेश पवार ,गणेश जाने, प्रदीप वाघ यांची विशेष उपस्थिती होती. सूत्रसंचालन गजानन मोरे यांनी केले.