16 हजाराची सिगारेट पाकीटे लंपास
चाळीसगाव । शहरातील भडगाव रोडवरील अंध शाळेच्या बाजुला असलेल्या पान शॉपचे कुलुप तोडुन 10 ते 11 फेब्रुवारीच्या रात्री आतील 16 हजार 370 रुपये किमतीचे सिगारेट पाकीटे अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहेत, याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर मुरलीधर बोरसे (वय-33 रा. शास्त्री नगर चाळीसगाव) यांच्या मालकीच्या भडगाव रोडवरील अंध शाळेच्या भिंती लगत असलेल्या बालाजी पान शॉपचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्यांनी 10 फेब्रुवारी 2018 रोजी रात्री 10 ते 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान आतील विवीध कंपन्यांचे 16 हजार 370 रुपये किमतीचे 132 सिगारेटची पाकीटे चोरुन नेली आहेत. 11 रोजी सकाळी 9 वाजता नेहमी प्रमाणे पान शॉप खोलण्यासाठी द्न्यानेश्वर बोरसे हे आले असता त्यांना हा प्रकार समजला याप्रकरणी त्यांच्या फिर्यादी वरुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. भूपेश वंजारी करीत आहेत.