चाळीसगावात पावसाची हजेरी

0

चाळीसगाव। पावसाळा सुरू होण्यास कमी कालावधी असला तरी गुरूवारी वातावरणात बदल होऊन सायंकाळी विजेच्या कडकडाटासह वादळी वार्‍यासह चाळीसगाव व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळी सव्वा चार वाजेच्या सुमारास जवळपास अर्धा तास पाऊस झाला. अचानक पाऊस सुरू झाल्याने व्यावसायिकांची तारांबळ उडाली. तर उकाळ्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असून शेतकर्‍यांचा अपेक्षा उंचावल्या आहेत. या वादळाने अनेक ठिकाणी घरांची पत्रे उडली होती.

वादळाने घरांची उडाली पत्रे
अनेक ठिकाणी वादळाने घरांची पत्रे उडाली तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडलेत,फुले कॉलनी स्थित नगरपरिषद 11 नंबर शाळेच्या पटांगणावर स्थलांतरित नगरपरिषद वसाहत कर्मचा-यांच्या घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली,कर्मचारी कुटुंबियांसाठी बांधण्यात आलेली घरे वादळाने उखडून शेजारी राहत असलेल्या घरांवर जाऊन पडलीत,सुदैवाने या घरात रहिवास नसल्याने यात कुणाला इजा झाली नाही,मा.आ.राजीव देशमुख यांनी आपल्या सहकार्‍यांसोबत घटनास्थळी भेट देत माहिती जाणून घेतली, तहसीलदार कैलास देवरे यांना बोलावून नागरिकांच्या व्यथा समजून सांगत सुचना केल्यात. शहरात वादळामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याने वीज पुरवठा खंडित झालेला आहे.