चाळीसगावात पोदार इंटरनॅशनल शाळेत गुणगौरव कार्यक्रम

0

विद्यार्थी प्रतिनिधींची निवड व विविध विजेत्यांना बक्षिसांचे वाटप

चाळीसगाव- शहरातील काडी कारखाना परीसरात असलेल्या पोदार इंटरनॅशनल स्कुलमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी निवड, विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण तसेच आदर्श शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गाणे सादर केली तर चिमुकल्या विद्यार्थ्यांनी कला कौशल्य सादर करीत चित्रपट गतावर धमाल नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘दैनिक जनशक्ती’चे उपसंपादक अर्जुन परदेशी तर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, सकाळचे उपसंपादक आनन शिंपी प्राचार्य लता उपाध्याय यांची प्रमुख उपस्थिती होती

यांचा झाला गौरव
शाळेच्या विद्यार्थी संसद निवडीत विजयी ठरलेले विद्यार्थी प्रमुख पदी ओम राजू पाटील तर अनन्या पाटील हिची विदयार्थीनी प्रमुख म्हणून निवड करण्यात आली तर धनंजय पाटील, प्रमोद पाटील, तेजस्वी भावसार, सपना लोहारकर ,कन्हैया बोरसे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले यासर्वांचा प्राचार्या प्रा. लता उपाध्याय यांचे शुभहस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

बक्षीस विजेत्यांना पुरस्कार
शाळेतील विविध स्पर्धेत विजयी विद्यार्थी टीना घुले, अवंती महाजन, अनुष्का चिंधडे, अंजली ठेंग, अर्जुन पूर्णपात्रे, परिण मोराणकर, ओजस कोठारी, ज्योतिरादित्य शिंदे,कौस्तुभ चव्हाण, अश्विन पाटील, भक्ती कोतकर, भाविक कोतकर, सृष्टी पाटील , रितिका भोकरे, साहिल पाटील अनन्या पाटील ऋषील वाघ, यशस्वी जमवेचा, हिमांशू देसले, तेजस पाटील, मृणाल राजपूत, हर्ष अग्रवाल, मनन बोहरा यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देण्यात आली

पालकांची उपस्थिती
आजच्या बक्षीस समारंभात अनेक विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले यावेळी पालक सर्वश्री संपदा पाटील , ग्रामिण रुग्णालयाचे डॉ बी पी बाविस्कर ,चाळीसगाव एज्युकेशन चे सचिव डॉ विनोद कोतकर ,आई फाउंडेशन च्या डॉ चेतना कोतकर, एज्युकेशन सोसायटीचे संचालक डॉ सत्यजित पूर्णपात्रे , सामाजीक कार्यकर्त्या डॉ शुभांगी पूर्णपात्रे, डॉ महेश पाटील ,डॉ पल्लवी पाटील,रोटरी चे माजी अध्यक्ष डॉ प्रशांत शिनकर ,डॉभाग्यश्री शिनकर, डॉ विनय ठेंग ,डॉ योगिता ठेंग, सेवानिवृत्त मुख्यध्यापिका मधूलिका महाजन, डॉ गजेंद्र अहिरराव, डॉ श्रद्धा अहिरराव, प्रवीण भोकरे ,शीतल भोकरे, हर्षद ढाके, यांच्या सह अनेक पालक उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन शिंपी, धनंजय पाटील, प्रमोद पाटील,कन्हैया बोरसे, तेजस्वी भावसार, सपना लोहारकर,सुरेखा पाटील, पंकज देवकर, ईश्वर वाघ, अभिलाषा रोकडे,धनश्री भावसार यांच्या सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे खुमासदार सूत्र संचालन सादिक शेख व कविता शिंदे यांनी केले.

आदर्श नागरिक घडविण्यासाठी मेहनत – प्राचार्य लता उपाध्याय
आमच्या शाळेत विद्यार्थ्यांवर शैक्षणिक गुणवत्तेबरोबर ,संस्कारमूल्ये, शारीरिक शिक्षण, व्यक्तिमत्व विकास, विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात पालकांशी खुला संवाद साधून विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती करण्यासाठी मेहनत घेतली जाते आमच्या शिक्षकाकडून प्रत्येक विद्यार्थ्यांवर जातीने लक्ष ठेवतात त्यांच्या अभ्यासक्रमातील बारीकसारीक अडचणी सोडवित असल्याने सर्वच शिक्षक विदयार्थी प्रिय आहे यातून गुणवत्ता पूर्ण विद्यार्थी तसेच आदर्श नागरिक घडणार आहे ते येणार्‍या भविष्यात आमच्या शाळेचा नावलौकिक नक्कीच वाढवतील.

तालुक्यातील एकमेव आदर्श शाळा
या शाळेचे सुंदर कॅम्पस हा पालकांना सह मुलांना आकर्षित करतो.या शाळेचे विद्यार्थी कला क्रीडा व विविध स्पर्धेतून शाळेचा लौकिकात भर घालीत आहे शिस्तीचे काटेकोर पालन करण्यासाठी प्राचार्या व व्यवस्थापन समिती आपले कर्तव्य चोख पार पाडीत आहे तज्ञ शिक्षक हे विद्यार्थ्यांमध्ये समरस होऊन शिकवीत असल्याने ही शाळा तालुक्यात सर्वोत्कृष्ट इंग्रजी माध्यमाची एकमेव शाळा म्हणून गौरविली जात असल्याचे प्रतिपादन बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष जनशक्ती चे उपसंपादक अर्जुन परदेशी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.