डीबी पथकाची कामगिरी ; सापळा रचून केली अटक
चाळीसगाव:- बस न थांबवल्याच्या कारणावरून बसचालक शंकर रामराव महाजन यांना तीन संशयीतांनी 5 रोजी हिरापूर रोडवर चाकू हल्ला करून जखमी केले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अज्ञात आरोपींचा शोध सुरू होता. गुप्त माहितीवरून पोलिसांनी 18 रोजी रात्री नालंदा शाळेजवळील आरोपी निखील सुनील कुडे (एम.जे.नगर, चाळीसगाव), नितीन अण्णा मालदकर (नालंदा शाळेजवळ, चाळीसगाव) व मनीष प्रमोद जाधव (महावीर हॉस्पीटलसमोर, चाळीसगाव) यांना अटक केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
यांनी केली कारवाई
चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक अरविंद पाटील, पोलीस निरीक्षक रामेश्वर-गाढे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक आर.बी.रसेडे, उपनिरीक्षक युवराज रबडे, डीबी शाखेचे हवालदार शशीकांत पाटील, अरुण पाटील, राहुल पाटील, बापू पाटील, नितीन पाटील, नरेंद्र नरवाडे आदींनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.