चाळीसगाव : भामट्याने हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदल करीत शेतकर्याला 36 हजारांचा गंडा घातला. अज्ञात भामट्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा
सतीश दगडू चव्हाण (44, रा.मु.पिंप्री पोस्ट, गणेशपूर, ता.चाळीसगाव) हे 18 मे 2022 रोजी भडगाव रोडवरील एसबीआय बँकेच्या एटीएम येथे पैसे काढण्याकरीता आल्याने पैसे निघत नसल्याने सतीश चव्हाण यांच्या पाठीमागे उभा असलेला व 40 वयोगटातील तरुणाने मी तुमचे पैसे काढून देतो, असे म्हणून सतीश चव्हाण यांचे एटीएम कार्ड घेत त्यांच्याकडून पीन नंबर घेऊन हातचलाखीने एटीएम कार्डच्या ऐवजी दुसरे एटीएम कार्ड दिले. तसेच एटीएम कार्डचा वापर करून सतीश चव्हाण यांच्या बँक खात्यातून 36 हजार रुपये काढून घेवून फसवणूक केली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक दीपक पाटील करीत आहेत.