चाळीसगाव । गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेले भारनियमन चाळीसगाव शहरात सुरू झाले असून शहरातील पाच फिडरवरील 132 केव्ही सबस्टेशन वरील व 33 बाय 11 केव्ही सिटीयमन सब स्टेशनवरुन ठराविक वेळेत व भागात विजवितरण कंपनीच्या वतीने भारनियमनात करण्यात येणार असून ज्या भागात विज गळती व जास्त विज चोरी होत असेल त्या भागात जास्त प्रमाणावर भारनियमन होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे चाळीसगाव कार्यालयाचे कार्यकारी अभियंता एन.के. सोनवणे व नियंत्रण कक्ष प्रताप सपकाळ यांनी दिली आहे. शहरातील काही भागात विज हानी, विज गळती व विजचोरी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने त्या भागावर विज वितरण कंपनीने लक्ष केंद्रीत केले आहे. चाळीसगाव शहरात विजेचे भारनियमनाचा तक्ता तयार करण्यात आले आहे.
याप्रमाणे राहणार शहरातील भारनियमान
सबस्टेशनमधील 132 केव्हीवरुन विजप्रवाह असलेल्या डेअरी फिडर वरील हिरापूर रोड, डेअरी भाग, स्टेशन रोड, शासकीय विश्रामगृह, शहर पोलिस स्टेशनपर्यंत या भाग न्यायालयाजवळील भाग, ग्रामीण पोलिस स्टेशनपर्यंत, भडगावरोड, कॉटन कॉर्नरपर्यंत या भागात सकाळी 6.30 ते 9.15 व दुपारी 3.15 ते 6.00 पर्यंत भारनियमन असणार आहे, सिटीमन फिडरवरील हिरापूर रोडचा काही भाग नवीन नाका, पवारवाडी, नारायणवाडी, सिंधी कॉलनी, टाकळी प्र.चा पर्यंत शिवशक्ती नगर भाग, खरजई रोड, हॉटेल दयानंदपर्यंत या भागात सकाळी 6 ते 9.15 सायंकाळी 5.15 ते 8.15 भारनियमन, टाऊन फिडरवरील हिरापूर रोडचा काही भाग तिरंगा पुल, पाटणादेवी रोड, चामुडा माता मंदिर, बामोशी बाबा दर्गा परिसर,पाटील वाडा, प्रताप चौक, नदी किनारा, शिवाजी घाट तसेच आंबेडकर चौक परिसर.
सराफ बाजार, रथगल्ली या ठिकाणी सकाळी 5.30 ते 8.30 दुपारी 11.30 ते 2.45 व सायंकाळी 7 ते 10 या वेळेत भारनियमन, तर सब स्टेशनवरुन 33 बाय 11 केव्ही सिटीयमवरुन आलेल्या हुडको फिडर वरील चौधरीवाडा, हुडको कॉलनी वरुन आलेल्या हुडको कॉलनी डोहरताडा, भिमनगर, सुवर्णाताई नगर, सेंट्रर नाका, नागदा रोड, उर्दू हायस्कूल परिसर या ठिकाणी सकाळी 5.30 ते 8.30 दुपारी 11.30 ते 2.45 व सायंकाळी 7.10 या वेळेत भारनियमन, धाररोड फिडर वरील हॉटेल सदानंदपासून छाजेड ऑईल मिल, घाटरोड पाणी टाकी परिसर, कृउबा परिसर, बाजारपेठ, रामवाडी, आदित्यनगर या परिसरात सकाळी 6 ते 8.45 दुपारी 12 ते 3 सायंकाळी 7 ते 9 या वेळेत भारनियमन होणार आहे. जुने विमानतळ फिडरवर एमआयडीसी सबस्टेशन 33 बाय 11 केव्हीवरुन विज असलेल्या विमानतळ, नवीन बायपास, मालेगाव रोड, जुना मालेगाव रोडवरील स्टेशन भाग, आनंदवाडी, पंचशिल नगर, शासकीय दुध डेअरी, जे.जे. आण्णा टावर भाग, आदर्शनगर, धुळेरोड, डेराबर्डी, संगीत भामा मंगल कार्यालय, करगावरोड गणपती मंदिरापर्यंत या भागात सकाळी 5.30 ते 9 व सायंकाळी 5 ते 8.30 पर्यंत भारनियमन होणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता एन.के. सोनवणे व नियंत्रण कक्ष प्रताप सपकाळ यांनी दिली आहे.