चाळीसगावात मतिमंद विद्यालयात अन्नदान

0

चाळीसगाव। पिपल्स सोशल फाऊंडेशनचा 3रा वर्धापन दिन मंगळवार 22 ऑगस्ट 2017 रोजी अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. फाऊंडेशनच्यावतीने धुळे रोड येथील मतिमंद विद्यालयामध्ये अन्नदान करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे माजी उपनगराध्यक्ष भगवान पाटील तसेच न.पा. बांधकाम सभापती विजया पवार, नगरसेवक रामचंद जाधव, जगदिश चौधरी, हेमंत पाटील, डॉ. तुषार राठोड उपस्थित होते. फाऊंडेशनचे अध्यक्ष आकाश पोळ यांनी आपल्या प्रास्ताविकातून पिपल्स फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षामध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील किंवा सामाजिक प्रश्न वेळोवेळी निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनापुढे निर्भीडपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच शिव-फुले-शाहू-आंबेडकर , पुरोगामी विचार शहरात व ग्रामीण भागात महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथिनिमित्ताने समाज प्रबोधनाचे कार्यक्रम करण्यात आले. तसेच राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त स्वच्छता अभियान कॉलेज व देवळी गावामध्ये मोठ्या प्रमाणात लोक सहभागातुन राबविण्यात आले. फाऊंडेशनच्या वतीने शहिदांना आर्थिक मदत देखील करण्यात आली.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परीश्रम
फाऊंडेशनच्या माध्यमातुन अभिनव पद्धतीचे कार्यक्रम चाळीसगांव शहरात व ग्रामीण भागात राबविण्यात आले व तसेच फाऊंडेशनचे सर्व कार्यकर्ते पुढील कार्य करण्यास कटीबद्ध आहे असे सांगण्यात आले. यावेळी अध्यक्ष आकाश पोळ, उपाध्यक्ष शिवसागर पाटील, मुख्य संघटक सागर मोरे, अरविंद खेडकर, मंगेश साळवे, राहुल साळवे, अमोल पाटील, स्वप्नील जाधव, उमेश सरदार, सागर निकम, यज्ञेश बाविस्कर, शुभम महाजन, भरत पाटील, प्रणाल पवार, अनिकेत पोळ, प्रवीण जाधव,निरज अजबे शुभम सोनवणे, शंनेश्वर गायकवाड, सागर अहिरे, अतुल पाटील, मयूर पाटील, किरण पाटील, निखिल मोराणकर, हर्षल पवार, प्रदीप मोरे, विशाल महाले, मोहन बागुल, अझरुद्दीन मुल्ला, ऋषिकेश खेडकर, पवन महाजन, अभिषेक महाजन, ललित महाजन, पंकज चिंचोले, राहुल गायकवाड, सागर गायकवाड, अनिकेत निक्कम, मुकुल निकम, अक्षय पाटील, हर्षल पाटील, धनंजय वाघ, सगर मगर आदि परिश्रम घेतले