चाळीसगावात मानाच्या गणपतीची स्थापना

0

चाळीसगाव । चाळीसगाव तालुक्याचा मानाचा व 71 वर्षांची परंपरा असलेल्या नेताजी पालकर चौकाच्या गणपतीची मिरवणुक आज दिनांक 25 रोजी होवुन विशेष म्हणजे शहरातील जामा मशीद जवळ आरती होवुन सायंकाळी 4 वाजता नेताजी चौकात स्थापना करण्यात आली गणपती उत्सवासाठी चाळीसगाव येथे तब्बल 9 अधिकारी व 200 पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आज गणपती बाप्पांचे आगमन होत असल्याने तालुका व शहरात गणेश भक्तांची गणेश मूर्ती व पुजेचे सामान घेण्यासाठी तोबा गर्दी उसळली होती गणेश मूर्ती व पूजेचे साहित्य तहसील कार्यालय, पंचायत समिती, पोस्ट ऑफिस, कृषी स्टेट बँक, गणेश रोड, जिल्हा परिषद बांधकाम ऑफिस जवळ व शहरातील मुख्य चौकामध्ये असल्याने आज सकाळपासुनच शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतुक जाम झाली होती.

शहरातून गणपती मूर्तीची मिरवणूक
शहरातील गणपती मध्ये मुख्य आकर्षण म्हणजे शहरातील मानाचा गणपती असलेल्या व 71 वर्षांची परंपरा असलेल्या नेताजी पालकर चौकाचा गणपती भव्य मिरवणुक सकाळी 10 वाजता काढण्यात आली जुनी नगरपालिका, सराफ बाजार मार्गे मिरवणुक सालाबादाप्रमाणे घाटरोड वरील जामा मशीदसमोर दुपारी 2-20 वाजेच्या सुमारास आली याठिकाणी हिंदु मुस्लिम बांधव एकत्र येत असल्याने काही काळ तणावाचे वातावरण असते मशीद जवळ मिरवणुक आल्यानंतर आमदार उन्मेश पाटील, माजी आमदार राजीवदादा देशमुख व मान्यवरांच्या हस्ते गणपती पूजन करण्यात आले. यावेळी डीवायएसपी अरविंद पाटील, शहर पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील, ग्रामीण पोनि भाऊसाहेब पटारे, सपोनि राजेंद्र रसेडे व पोलीस कर्मचारी यांच्यासह सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नगरसेवक नेताजी चौकातील गणपती मंडळ अध्यक्ष जगदीश महाजन, उपाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, एकनाथ सोमवंशी, चेतन पाटील, पप्पु देसले, महेश राजपुत, गोकुळ वाघ, नीलेश चौधरी, संजय गवळी, वासुदेव सूर्यवंशी आदी मंडळ कार्यकर्ते उपस्थित होते

 

 

आमदार एकनाथराव खडसेंच्या निवासस्थानी गणेशमुर्तीची स्थापना
मुक्ताईनगर । माजी महसुलमंत्री एकनाथराव खडसे यांनी कोथळी येथील आपल्या निवासस्थानी गणरायाच्या मुर्तीची स्थापना केली. यावेळी त्यांच्यासोबत दूध संघाच्या अध्यक्षा मंदाताई खडसे, खासदार रक्षा खडसे यांसह नातवंडांनी भक्तिभावे श्रींचे पूजन केले.

आमदार किशोर पाटील यांनी सपत्नीक केली आरती
पाचोरा । आमदार किशोर पाटील यांच्या निवासस्थानी गणरायाची स्थापना करण्यात आली. सायंकाळी आमदार किशोर पाटील यांनी पत्नी माजी नगराध्यक्षा सुनिता पाटील यांच्यासह आरती केली. यावेळी मुकुंद बिल्दीकर, नगराध्यक्ष संजय गोहिल आणि रवि केसवाणी आदी उपस्थित होते.

पोलिसांचा होता चोख बंदोबस्त
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये म्हणुन जामा मशीद सकाळपासुन लाल कापडाने झाकुन ठेवण्यात आली होती. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बछाव यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी अरविंद पाटील, शहर पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांच्या सपोनि राजेंद्र रसेडे, 1 सपोनि, 6 पोउनि, 65 पोलीस कर्मचारी, 35 होमगार्ड, जळगाव येथील 10 कर्मचारी ची एक स्ट्रॅकींग फोर्स, 10 कर्मचारी चे 1 ईआरडी पथक, 40 कर्मचारी चे 2 आरसीपी प्लाटुन, असे एकुण 200 पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता यातील पोलीस व होमगार्ड आणि 1 ईआरडी पथक गणपती उत्सव दरम्यान 10 दिवस बंदोबस्तासाठी राहणार आहेत.