चाळीसगावात मोकाट जनावरांचा हैदोस

0
रहदारीला अडथळा
चाळीसगाव– शहरात गेल्या काही दिवसांपासुन मोकाट जनावरांचा हैदोस वाढला असुन ही जनावरे हमरस्त्यावर थांबत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होवुन छोटे मोठे अपघात देखील झाले आहेत या मोकाट जनावरांचा नगर परीषदेने बंदोबस्त करावा अशी मागणी होवु लागली आहे.
         चाळीसगाव शहरातील जवळपास सर्वच मुख्य रस्त्यांवर मोकाट फिरत असलेल्या गायी, गाढवे व कुत्रे मोठ्या प्रमाणावर ठाण मांडुन बसलेले असतात वेळप्रसंगी त्यांच्या मध्ये एकमेकांवर धावुन जाणे अथवा मारण्याचे प्रकार होत असल्याने ते सैरावैरा पळत सुटतात त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या वाहनांसमोर ही जनावरे अचानक पणे येत असल्याने अनेकदा छोटे मोठे अपघात झाले आहेत तर रस्त्याने पायी जाणाऱ्या पादचा-यांना देखील यापासुन अनेकवेळा ईजा झाल्याचे प्रकार देखील झाले आहेत.
शहरात मोठ्या प्रमाणावर या गायी फिरत असतात मात्र या गायी कुणाच्या आहेत त्यांचा मालक कोण असा सवाल उपस्थित होवु लागला आहे तर अचानकपणे गेल्या काही महिन्यापासून गाढवांचे प्रमाण देखील वाढले असुन ही गाढवे देखील रस्त्यावरुन सैरावैरा पळतात व कुत्रे पण अशाच प्रकारे पळतात म्हणुन पायी चालणाऱ्याना आपला जिव मुठीत धरुन रस्त्यावरुन चालावे लागत आहे. नगरपरिषदेने या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता होवु लागली आहे.