चाळीसगावात मोटारसायकल चोरणार्‍यास अटक

0

चाळीसगाव । चाळीसगाव शहरात खडकी बायपास जवळ एक इसम चोरीस गेलेली मोटारसायकल फिरवत असल्याचे पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफिने सापळा रचून आरोपीसह वीस हजार किंमतीची मोटारसायकलसह पकडून आरोपीविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहर पोलिस स्थानकाचे पोहेकॉ शशिकांत पाटील, बापू पाटील व राहुल पाटील यांना शहरापासून काही अंतरावर अनोळखी इसम चोरीस गेलेली मोटारसायकल फिरवत असल्याची गुप्त माहिती मिळाली. पो.नि.रामेश्‍वर गाडे पाटील यांच्या सुचनेनुसार पोलिस पथकाने आरोपी सुनिल जगन मोर (वय-20, हिरापूर रोड, नविन नाक्याजवळ) यास पकडून त्यांच्याजवळ चोरीस गेलेली मोटारसायकल क्र.(एमएच 19 बीई 1433) ताब्यात घेतली. सदरील मोटारसायकल चोरीस गेल्याबाबत शहर पोलिसात 19 नोव्हेंबरला नोंद करण्यात आली आहे.