चाळीसगावात युवा संघटक मंगेश चव्हाण यांचा गौरव

0

वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील दिग्गज उपस्थित

चाळीसगाव – गेल्या आठ ते दहा वर्षांपासून कोणतेही काम मनापासून, प्रामाणिक राहून चिकाटीने केल्याने यशस्वी झालो. उद्योगात आईवडिलांचा हा संस्कार जपला याचा आनंद आहे. आयुष्यात चारदा शून्याचा सामना करावा लागला मात्र या मोठ्या शून्यातून आजची गगनभरारी घेता आली यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळाला यात असंख्य मित्रांचा मदतीचा हात असल्याची हृदयभावना सत्कारमूर्ती युवा उद्योजक मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केली. राजपूत मंगल कार्यालयात आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.

“उन्मेष” मधून “मंगेश” वजा करणे अशक्य- आमदार उन्मेष पाटील
माझा जिवलग मित्र मंगेश ने भावाच्या भूमिकेतून माझ्या पाठिशी तू भिऊ नकोस तू पाठिशी आहे हा भक्कम आधार दिला त्यामुळेच उन्मेष तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आमदार होऊ शकला आयुष्यात किती संपत्ती कमावली याला महत्व नाही मात्र मंगेश सारखा जिवाभावाचा मित्र मला मिळाला हीच माझी खरी संपत्ती ,अनमोल खजिना आहे समाजासाठी सतत नवनवीन कल्पना राबविण्याची त्याची वृत्ती मला भावते , बोलेन ते करेन त्यासाठी झोकून काम करण्याची धमक असलेला मंगेश चा आत्मविश्वास आमच्या सर्वांसाठी साधने नसतांना शिखरावर पोहचण्यासाठी महत्वाचा आहे .जो समाजाला नेहमी मदत देण्याची भाषा करतो त्याला परमेश्वर कमी करीत नाही असे सांगून आमदार उन्मेष पाटील यांनी कधी कधी आम्ही राजकारणी हिरा सॊडून गारगोटीच्या मागे लागतो हार्ड वर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क करण्यावर मंगेश चा भर असतो त्या भावनेतूनच *शहरात पंन्नास सिसिटीव्ही कॅमेरे व सात सायन्स सेंटर* त्यांने भेट दिली आहेत

दिग्गजांची होती उपस्थिती
लोकार्पण व अभिष्टचिंतन सोहळाच्या अध्यक्षस्थानी खासदार ए टी नाना पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय सावकारे, आमदार किशोर पाटील, नगराध्यक्ष राजेश वानखेडे, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, प्रांताधिकारी शरद पवार, तहसिलदार कैलाश देवरे, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे पाटील,  नगराध्यक्ष करण पवार, जि.प.शिक्षण सभापती पोपट भोळे, समृध्दी शुगरचे घाडगे पाटील, माजी जिप सदस्य बाळासाहेब पवार , उद्योजक मुकुंद बिल्दीकर, घृष्णेश्वर शुगर चे भूषण भोसले , चाळीसगाव च्या नगराध्यक्ष आशालता चव्हाण, पंस सभापती स्मितल बोरसे गटनेते राजेंद्र चौधरी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रमेश चव्हाण,योगाचार्य बाबासाहेब चंद्रात्रे ,प्रितमदास रावलानी यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते

सामाजिक दातृत्वाचा शब्दगौरव
मंगेश चव्हाण यांच्या सामाजिक दातृत्वाचा अनेक मान्यवरांनी गौरव केला सावद्याचे नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनी मंगेश दादांची राजकारणा पलीकडील मैत्री असून आमच्या मित्रांच्या गोतावळ्यात सर्वांची ख्याली खुशाली ठेवण्यात तो आघाडीवर असतो आमदार किशोर आप्पा पाटील यांनी शहरात सिसिटीव्ही कॅमेऱ्यांची गरज पटवून देत त्यामुळे पोलिसांना व नागरिकांना मोठी मदत होणार आहे तसेच सायन्स सेंटर मधून विद्यार्थ्याना चांगली सुविधा उपलब्ध होईल माजीमंत्री संजय सावकारे यांनी महागड्या गाड्यात फिरणारा हा मंगेश नेमका काय व्यवसाय करतो याचे कुतूहल होते मात्र तो करीत असलेला उद्योग मेहनतीने करून त्याने ही गगनभरारी घेतल्याचे विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार ए टी नाना पाटील यांनी मंगेश च्या सामाजिक दातृत्वाची प्रशंसा केली व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या भाजप तालुकाध्यक्ष के बी साळुंखे ,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील जेष्ठ नगरसेवक राजेंद्र आण्णा चौधरी यांनी मनोगत व्यक्त केली प्रास्तविक पंस उपसभापती संजय पाटील यांनी तर आभार जितेंद्र वाघ यांनी व्यक्त केले कवी मनोहर आंधळे यांनी खुमासदार सुत्रसंचालन केले.

राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या
गेल्या चार पाच दिवसांपासून शहरात व तालुक्यात युवा संघटक यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाच्या जय्यत तयारी ची चर्चा सुरू होती एखादा राजकीय पुढाऱ्यांला लाजवेल असे नियोजन प्रसिद्ध विधिद्य धनंजय ठोके , भाजप शहराध्यक्ष नगरसेवक घृष्णेश्वर पाटील , नगरसेवक नितीन पाटील व कुशल संघटक जितेंद्र वाघ यांनी केले होते फक्त वाढदिवस साजरा न करता शहराला सिसिटीव्ही व तालुक्यातील शाळांना सत्त्यातर साहित्याचे सायन्स सेंटर दिल्याने या अनोख्या वाढदिवसाचा नेमका अंदाज राजकीय निरीक्षकांना देखील बांधता आलेला नाही मात्र उन्मेषदादांना ऐनवेळी खासदार म्हणून दिल्ली ला जावे लागले तर वेळेवर धावपळ नको म्हणून मंगेशदादांचे “राजकीय लॉंचिंग” करून ठेवायला पाहिजे या सर्वातून हा भव्यदिव्य सोहळा आयोजित करण्यात आल्याची चर्चा मात्र तालुक्यात ढवळून निघाली आहे