चाळीसगावात रक्त शर्करा तपासणी शिबीर

0

चाळीसगाव । मधुमेह मुक्त भारत अंतर्गत जेसीआय चाळीसगाव सिटी व जॉगींग असोसिएशन च्या वतीने शहरातील सुवर्णाताई उद्यानात रक्त शर्करा तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 120 जणांची रक्त शर्करा तपासणी करण्यात आली. एम. डी. पॅथालॉजीस्ट डॉ तुषार आप्पासाहेब राठोड यांनी मोफत तपासणी केली. शरीरातील रक्त शर्करा प्रमाणावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मधुमेहाविषयी जनजागृती
जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून शहरातील सुवर्णाताई उद्यान येथे उद्यानात सकाळी मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे आयोजन करीता हरेश जैन, विनोद पारख, सचिन पवार, दिपक देशमुख, सोपान चौधरी, खुशाल पाटील, महेश महाजन, प्रितेश कटारिया, संजय पवार, चंद्रकांत ठोंबरे, शिवलाल साबणे, देवेन पाटील गजानन मोरे निलेश निकम, अशोक चौधरी, सुरेश मंधानी, टोनी पंजाबी यांनी परिश्रम घेतले. उद्यानात रोज सकाळी मॉर्निंग वॉक व व्यायाम करण्यासाठी येणार्‍या व्यक्ती साठी सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जेणेकरून मधुमेह विषयी जागरूकता वाढून शरीर स्वास्थ्य राखण्यासाठी मदत होईल. तसेच रक्तातील साखरेचा समतोल साधण्यासाठी नियमित व्यायाम करणे साठी प्रोत्साहन सर्वांना मिळेल अशी माहिती प्रोजेक्ट कोऑर्डीनेटर सचिन पवार यांनी दिली.