चाळीसगावात रयत सेना चालक-मालक तर वाकडी येथे रयत सेना शाखेचे उद्घाटन

0

चाळीसगाव । शहरातील सिग्नल पॉईंट येथे काळी पिवळी वाहन चालक मालक रयत सेनाचे शाखा फलक तर तालुक्यातील वाकडी येथे रयत सेना शाखा फलकाचे उद्घाटन करून यावेळी दोन्ही शाखेची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यावेळी संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी आपल्या मनोगत व्यक्त करत रयत सेना ही सर्व सामान्यांची संघटना असून तळागाळातील सर्वसामान्य जनतेचेव शेतकरी, विद्यार्थी, कामगार, महिला यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशिल असल्याचे यावेळी सांगितले.

वाकडी येथे कार्यकारिणी जाहिर
तालुक्यातील वाकडी येथे रयत सेना शाखा फलकाचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांच्याहस्ते करण्यात आले. शाखेची कार्यकारणी घोषित करण्यात आली. शाखाध्यक्ष संदिप पाटील, उपाध्यक्ष चंदन पाटील, कार्याध्यक्ष गोरख पाटील, कोषाध्यक्ष निलेश पाटील, सदस्य नितीन पाटील, पंकज पाटील, शुभम पाटील, विकास पाटील, प्रविण पाटील, अमोल पाटील, अशिष पाटील, सोनु पाटील, गोपाल पाटील, अनिल पाटील, संदिप सूर्यवंशी, अशोक पाटील, अजय पाटील, ईश्वर सूर्यवंशी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. वाकडी शाखेचे आयोजन रयत सेना विभागप्रमुख सागर सूर्यवंशी यांनी केले होते.

चालक मालक सेना कार्यकरिणी
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक (सिग्नल पॉईंट) येथे सकाळी 9 वाजेच्या सुमारास रयत सेना प्रणित काळी पिवळी चालक मालक सेना फलकाचे उदघाटन संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी कार्यकारणी घोषित केली चालक मालक सेना शाखा अध्यक्षपदी रवींद्र पवार, उपाध्यक्ष तुषार येवले, सचिव गयास मुजावर, कार्याध्यक्ष सचिन जगताप, सदस्य प्रकाश पवार, श्यामकांत पवार, विनोद पवार, रवींद्र जगतात, मोबीन मन्यार. तौफीक शेख, सरवर अली, मुस्ताख पिंजारी, प्रदीप पवार, संजय जगताप, दगडु खान, रवींद्र पवार, वसिम मन्यार, समाधान पवार, बापु बोरसे, दिपक जगताप, जाकीर अली, भाईदास पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावेळी शेतकरी सेना जिल्हाअध्यक्ष दिपक राजपुत, जिल्हाअध्यक्ष संजय कापसे, जिल्हाउपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोल्हे, राजेश पाटील, समन्वयक पी.एन. पाटील, संघटक पप्पु पाटील, शिक्षक सेना जिल्हा उपाध्यक्ष दिनेश चव्हाण, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष पंकज पाटील, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, विलास मराठे, तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील, विभाग प्रमुख सागर सूर्यवंशी, जयदीप पाटील, सप्निल पाटील, संदिप सोनवणे, वैभव पवार, हर्षल सोनवणे, रामा कोल्हे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर सूर्यवंशी तर आभार पंकज पाटील यांनी मानले.