चाळीसगावात राज्यस्तरीय सामाजिक ऐक्य परिषद यशस्वी

0

सामाजिक अन्यायाविरोधात एकवटल्या पुरोगामी संघटना

चाळीसगाव  । चाळीसगाव येथे फुले, शाहु, आंबेडकरी विचारांच्या पुरोगामी सामाजिक संघटनांच्या ऐक्यासाठी रविवारी सामाजिक एक्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. बौध्द महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोकराव आंबेडकर, कार्याध्यक्ष राजरत्न आंबेडकर, बंजारा समाजाचे अविनाश चव्हाण, दिल्लीचे अशोक भारती, राजस्थानचे ताराराम मेहता, जम्मु काश्मीरचे अशोक बसोला, मातंग समाजाचे संजय त्रिभुवण उपस्थित होते.

शालेय अभ्यासक्रमात भारतीय संविधानाचा समावेश करावा

विविध ठराव मंजूर
या परिषदेत शालेय अभ्यासक्रमात भारतीय संविधानाचा समावेश करण्यात यावा, सर्वस्तरावरील आरोग्य सेवा मोफत देण्यात यावी, सर्व क्षेत्रातील खासगीकरण रद्द करावे, ओबीसी क्रिमीलेअरची अट रद्द करावी यासह विविध ठराव मंजूर करण्यात आले. एकलव्य संघटनेचे शिवाजीराव ढवळे यांनी, अन्यायाविरुध्द एकट्याने लढण्यापेक्षा सगळ्या उपेक्षित समुहाने एकत्रीतपणे लढावे असे प्रतिपादन केले.

यांनी घेतले परिश्रम
परिषदेचे आयोजन एकलव्य संघटनेचे शिवाजीराव ढवळे, स्वाभिमानी भारत अभियानाचे धर्मभुषण बागुल, एन.एन.एफ. चे सुनिल भालेराव, चर्मकार संघटनेचे भानुदास विसावे यांनी केले. या परिषदेच्या यशस्वीतेसाठी पवन सोनवणे, कालीदास अहिरे, रामचंद्र जाधव, सुधाकर वाघ, प्रमोद इंगळे, विजय निकम, किरण ठाकरे,मिलींद भालेराव, नितीन मरसाळे, स्वप्नील जाधव, दीपक ठाकरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

आंबेडकरी विचारांची ताकद
धर्मभुषण बागुल यांनी एकेका जातीच्या शंभर संघटना करण्यापेक्षा शंभर जातींची एकच संघटना निर्माण झाली पाहिजे असा आमचा नारा असून आंबेडकरी विचारांच्या संघटनांची स्वतंत्र ताकद तयार करण्याचे आमचे ध्येय आहे असे विचार मांडले. तर मागासवर्गीय समाजातील सुशिक्षीत व अधिकार्‍यांची देशभरातील शक्ती एक्य परिषदेच्या पाठीशी उभे करणार असल्याचा निर्धार सुनिल भालेराव यांनी बोलून दाखविला.