चाळीसगाव। तालुक्यात 5 जून रोजी रात्रीच्या सुमारास वादळी वार्यासह आलेल्या मुसळधार पावसाने झाडाच्या फांद्या व झाडे उनमळून विजेचे खांब व तारांवर पडल्याने तालुका भरातील जवळपास 70 ते 80 लोखंडी व सिमेंटचे पोल जमिनीवर व तारांवर पडल्याने शहरी व ग्रामीण भागाचा वीज पुरवठा रात्री व सायंकाळीपर्यंत खंडीत झाला होता तो वीज पुरवठा काही प्रमाणात सुरळीत झाला असून पोल पडून तारा तुटल्याने 3 डीपी पडून गेल्याने वीज वितरण कंपनीचे चाळीसगाव कार्यकारी अभियंता एन. के. सोनवणे यांनी माहिती दिली आहे.
चाळीसगाव शहरासह तालुकाभारात 5 जून रोजी रात्री 8 ते 8.30 वाजेच्या सुमारास वादळी वार्यासह मुसळधार पावसाला सुरूवात झाली. वादळी वारा व पावसाची तिव्रता मोठ्या प्रमाणावर असल्याने अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या, विजेचे लोखंडी व सिमेंटचे खांब व विजेच्या तारांवर पडल्याने जवळपास 70 ते 80 सिमेंट व लोखंडी विजेचे खांब पडले तर विजेच्या तारा तुटुन विज पुरवठा बंद झाल्याने अनेक गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. तालुक्यातील शिरसगाव, टाकळी, पिलखोड परिसरात जवळपास 40 च्या वर वीजेचे पोल पडले. हातले, वाकडी, रांजणगाव परिसरात 33 के. व्ही. चा पोल पडल्याने त्यात सांगवी, हातले आणि नागद हे 3 सब स्टेशन बंद पडून त्या भागातील 22 गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्याचप्रमराणे चाळीसगाव-भडगाव रोड वरील टाकळी, पातोंडा, बोरखडा, वाघळी, हिंगोणे या परिसरात 33 के.व्ही. च्या विजेच्या तारा तुटल्याने परिसरातील गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. विजपुरवठा बंद असला तरी आज सकाळीपासून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विज वितरण कपंनीचे शंभरावर कर्मचारी व 16 खाजगी ठेकेदारांचे कर्मचारी हे युद्ध पातळीवर काम करत होते.काही ठिकाणचे काम सुरू असल्याची माहिती विज वितरण कंपनीचे अभियंता एन.के. सोनवणे व नियंत्रण कक्षाचे वरिष्ठ तंत्रज्ञ प्रताप सपकाळ यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे तालुक्यात 3 डि.पी.पडून व विजेचे खांब आणि तारा तुटुन जवळपास 20 लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला आहेत.