चाळीसगावात रिक्षाची महिला व बालकाला धडक

0

चाळीसगाव । शहरातील करगाव रोड वरील दीपा कॉम्प्लेक्स समोर उभ्या असलेल्या महिला व 3 वर्षीय बालकाला भरधाव वेगाने येणार्‍या रिक्षाने धडक दिल्याने जखमी झाल्या असून धडकेत स्विफ्ट डिझायर कारचे नुकसान झाल्याची घटना 18 जून 2017 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली असून रिक्षा चालकाविरोधात शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील करगाव रोड वरील देवरे हॉस्पिटल समोर असलेल्या दीपा कॉम्प्लेक्स मधील रहिवासी मंजुषा राहुल ब्राह्मणकार या त्यांच्या 3 वर्षीय मुलगा अथर्व सोबत कॉम्प्लेक्सच्या खाली त्याच्या स्विफ्ट डिझायर कारच्या बाजूला उभ्या असतांना समोरून भरधाव वेगाने येणार्‍या ऑटो रिक्षा क्र एम 19 बी यू 6358 ने त्यांना धडक दिल्याने दोघे जण फेकल्या जाऊन जखमी झाले आहे. तर रिक्षा कार वर आदळल्याने रिक्षाचे व कारचे नुकसान झाले असून जखमींवर देवरे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे.