चाळीसगावात लॉजमध्ये बियाणे विक्रेत्याची आत्महत्या

0

चाळीसगाव- बी-बियाणे विक्रेते दीपक उर्फ शिवाजी श्रीराम पाटील (वय 35) या व्यवसायिकाने विषारी द्रव सेवन करुन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री नऊ वाजता स्टेशन रोड स्थित सुभाष रेसिडेन्सीमध्ये उघड झाली. मृत व्यवसायीक हातले येथील असून तीन दिवसांपासून ते बेपत्ता होते. मंगळवारी ते हरविल्याची खबर चाळीसगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली. हातले येथील बी – बियाणे विक्रेते दीपक उर्फ शिवाजी श्रीराम पाटील (35) यांचा मृतदेह मंगळवारी रात्री नऊ वाजता सुभाष रेसिडेंन्सी मध्ये रुम क्र. 111 मध्ये आढळून आला. त्यांच्या मृतदेहाशेजारी विषारी द्रवाची बाटली आढळून आल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी? असा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे. दीपक उर्फ शिवाजी पाटील यांच्या मोबाईलचे लोकेशन घेण्यात आले. यासाठी पोलिसांनी मोबाईल ट्रॅकर वापरले. ट्रॅकरवर स्टेशन रोड लगत सुभाष रेसिडेंन्सीमध्ये लोकेशन मिळाल्याने घटनेचा उलगडा झाला. तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज रबडे करीत आहे.