चाळीसगाव । चाळीसगाव तहसील कार्यालयाचे पथक रात्रीची गस्त घालत असतांना 23 मे 2017 रोजी 11 वाजता दरम्यान चाळीसगाव धुळे बायपासजवळ विना परमिट अवैध वाळूची चोरटी वाहतूक करणारे डंपर त्यांनी पकडल्याने डंपर चालकाने त्यांचेशी अरेरावीची भाषा करून शासकीय कामात अडथळा आणल्याने तहसीलदार घटनास्थळी येऊन त्यांनी सदर डंपर पोलिसांच्या ताब्यात दिले असता डंपर चालकाने तेथून पलायन केल्याने पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांचेवर गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता दोघा आरोपींना न्यायालयाने 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यामुळे वाळू चोरट्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
वाळूच्या डंपर सह चालक फरार
23 मे 2017 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास चाळीसगाव तहसील कार्यालयाचे पथक गस्त घालत असतांना चाळीसगाव धुळे बायपासजवळ त्यांना विनापरमिट अवैध वाळूची चोरटी वाहतूक करताना डंपर (एमएच 04 एफयू 4841) मिळून आल्याने या डंपरला थांबवून चालकाला नाव गाव विचारले असता अनोळखी चालकाने अरेरावीची भाषा वापरून सरकारी कामात अडथळा आणला. यावेळी त्यांचे सोबत आरोपी उमर भैया खाटीक (25, रा. पाटखडकी ता. चाळीसगाव) व डंपर मालक अक्तर हुसेन गुलाब हुसेन शेख (32, बाँबे आग्रारोड, धुळे) महसूल पथकातील कर्मचार्यांनी लागलीच तहसीलदार कैलास देवरे यांना घटनेची माहिती दिल्याने ते लागलीच घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पोलीस स्टेशनला फोन करून पोलीस बंदोबस्त मागवून सदर डंपर पोलिसांच्या ताब्यात दिले.
आरोपीस 6 दिवसांची कोठडी
रात्री 11:45 वाजेच्या सुमारास डंपर चालकाने रस्त्यातच डंपर सह पलायन केले. याप्रकरणी तहसीलदार कैलास देवरे यांच्या फिर्यादी वरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला वरील डंपर वरील अज्ञात चालक वाळू एजंट उमर भैया खाटीक (25, रा. पाटखडकी ता. चाळीसगाव) व डंपर मालक अक्तर हुसेन गुलाब हुसेन शेख (रा. धुळे) यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमर खाटीक व अक्तर हुसेन शेख या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 6 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि राजेंद्र रसेडे करीत आहेत. या घटनेमुळे परीसरात एकच खळबळ उडाली आहे.