शानदार सोहळ्यात उद्घाटन
विद्यापीठात लवकरच विद्यार्थी साहित्य संमेलनाचे आयोजन
चाळीसगाव – विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे याचाच एक भाग म्हणून येत्या काळात लवकरच विद्यार्थी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती कुलसचिव बी.बी. पाटील यांनी दिली आहे ते आज कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि बी. पी कला ,एस. एम. ए. विज्ञान आणि के. के. सी. वाणिज्य महाविद्यालय चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महावियालयीन युवक महोत्सवाचे (एरंडोल विभाग) उदघाटन करतांना बोलत होते. आज सोमवार २८ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता एरंडोल विभागीय युवारंग महोत्सवाचे उद्घाटन त्यांचे हस्ते झाले. ते पुढे म्हणाले की विद्यापीठाला कवियित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव दिल्याने आमची जबाबदारी वाढली आहे. बहिणाबाई दृढ अर्थाने अशिक्षित होत्या मात्र त्यांच्या कवितेतून जीवनाचे तत्त्वज्ञान लपले आहे. अश्या अनेक बहिणाबाई समाजात शोधण्याचे काम समाजाला करायचे आहे. त्यासाठी विद्यापीठाने एक ऐवजी जिल्ह्यात चार युवा रंग महोत्सवाचे आयोजन करण्याचे ठरविले आणि पहिला मान चाळीसगावाला मिळाला आहे.
—-
शानदार सोहळ्यात उद्घाटन
आमदार तथा सिनेट सदस्य उन्मेष पाटील यांच्या अनुपस्थितीमुळे स्वागताध्यक्ष कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव बी.बी.पाटील यांच्याहस्ते जात्यावर दळण दळून उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चा.ए.सो.चे मॅनेजिंग बोर्ड चेअरमन नारायण अग्रवाल तर आमदार सौभाग्यवती तथा उमंग परिवाराच्या संपदा पाटील, सस्थेचे अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब चव्हाण, सचिव डॉ. विनोद कोतकर, उपाध्यक्ष मिलिंद देशमुख डॉ.एम.बी. पाटील, प्रा.अनिल इंगळे, प्रा.सत्यजित साळवे, प्रा. विलास चव्हाण, प्रा.नितीन झाल्टे, प्रा.दिनेश नाईक, प्रा.नितीन बारी, राष्ट्रीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आर. जाधव, प्रा.बी.व्ही.पाठक, विश्वस्त अरविंद येवले, डॉ.राहुल कुलकर्णी, प्राचार्य डॉ.मिलिंद बिल्दीकर, उपप्राचार्य डॉ. प्रकाश बाविस्कर, उपप्राचार्या सलिल मुठाणे, उपप्राचार्य अजय काटे, प्रा.डॉ.पंकजकुमार नन्नावरे, कलामंडळ प्रमुख अप्पासाहेब लोंढे, कार्यालयीन प्रमुख हिलाल पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.मिलिंद बिल्दीकर यांनी तर आभार युवारंग विभागीय समन्वयक डॉ. पंकज नन्नावरे यांनी मानले. प्रा. किरण गंगापूर कर यांनी शेरोशायरी करीत खुमासदार शैलीत सूत्रसंचालन केले. यावेळी बावीस संघातून १९४ मुली,१४७ मुले आपली सव्हीस प्रकारच्या कला सादर करणार आहेत यासाठी चार रंगमंच तयार करण्यात आले आहे.
Prev Post