चाळीसगावात वीज कंपनी कर्मचार्‍यांना मारहाण : एकास अटक

चाळीसगाव : थकीत विज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचार्‍यासह अन्य कर्मचार्‍यास शिविगाळ, दमदाटी करून मारहाण केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. शहरातील गजाननवाडीत शुक्रवार, 24 डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता ही घटना घडली

महिला कर्मचार्‍यास शिविगाळ तर कर्मचार्‍यास मारहाण
शहरातील गजानन वाडीतील योगेश रमेश चौधरी या वीज कंपनीच्या ग्राहकांकडे विज बिल थकीत असल्याने महावितरण कंपनीकडून वारंवार पैसे भरण्याचे आवाहन करण्यात आले मात्र त्यानंतरही ग्राहकाने भरणा न केल्याने शुक्रवार, 24 डिसेंबर रोजी दुपारी 4.30 वाजेया सुमारास महावितरण कंपनीच्या महिला कर्मचार्‍यांनी आपल्या सहकार्‍यांना सोबत घेऊन वीज कनेक्शन खंडित करण्यासाठी गेले असता वीज ग्राहक तथा संशयीत आरोपी योगेश रमेश चौधरी यानी कारवाई करू देण्यास विरोध केला तसेच महिला कर्मचार्‍याला शिविगाळ केली तसेच कर्मचारी शिरीष मराठे यांच्या कानाखाली वाजवत मारहाण केली. योगेश चौधरी यांनी या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात फिर्याद दिल्यानंतर संशयीत आरोपी योगेश रमेश चौधरी विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. तपास सहा.निरीक्षक विष्णू आव्हाड करीत आहेत.