चाळीसगावात वृद्धेचा मृत्यू : एस.टी.चालकाविरोधात गुन्हा

चाळीसगाव : बँकेच्या कामानिमित्त चाळीसगाव आलेल्या पिलखोड येथील 80 वर्षीय वृद्धेचा बसच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी बसस्थानकात घडली. या प्रकरणी गुरुवारी बस चालकाच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला.

डोक्यावरून चाक गेल्याने जागीच महिलेचा मृत्यू
तालुक्यातील पिलखोड येथील पार्वताबाई लक्ष्मण पाटील (वय 80) ह्या बुधवारी दुपारी बँकेच्या कामानिमित्त चाळीसगाव येथे आल्या होत्या. काम आटोपल्यानंतर त्या घरी जाण्यासाठी सायंकाळी येथील बस स्थानकावर आल्या. त्यावेळी औरंगाबाद-धुळे या धुळे आगाराच्या बसने त्यांना जोरदार धडक दिली तसेच त्यांच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.