चाळीसगाव । चाळीसगाव येथे शिवसेना आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दि 15 मार्च 2017 रोजी मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजर व डीजेच्या गजरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती उत्साहाचे आयोजन तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आले होते. चाळीसगाव रेल्वे स्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धकृती पुतळ्याचे पूजन माजी आमदार साहेबराव घोडे, राविचे संचालक विश्वास चव्हाण, शिवसेनेचे महेंद्र पाटील, नानाभाऊ कुमावत, नगरसेवक सुरेश स्वार, शाम देशमुख, हाजी गफूर पहेलवान, सोमसिंग राजपूत, चंद्रकांत तायडे, आनंद खरात, रामचंद्र जाधव, संगीता गवळी, संजय पाटील, रोशन जाधव, बापू अहिरे, घृष्णेश्वर पाटील, आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेख रियाज, पत्रकार मुराद पटेल, स्वप्नील वडनेरे, गणेश पवार, अनिल भामरे, विजय गायकवाड, नंदकिशोर बाविस्कर, बबलू जाधव, त्यानंतर सायंकाळी 7 वाजता जयंती मिरवणुकीला रेल्वे स्टेशन पासून सुरवात झाली. ढोल ताशा व डीजेच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. रेल्वे स्टेशन, सिग्नल पॉईंट, वीर सावरकर चौक मार्गे जयंती मिरवणुकीचे विसर्जन घाट रोड स्थित प्रभात गल्ली येथे करण्यात आले. दरम्यान शहरात ठीक ठिकाणी मिरवणुकीत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता जिजाऊंचा सजीव देखावा
यावेळी अशोक पाटील, पंडीत पाटील, गुलाबराव पाटील, सुरेश पाटील, अरुण पाटील, अरुण पाटील, धुडकु पाटील, सुभाष पाटील, अजाबराव पाटील, पितांबर पाटील, गोरख पाटील, रवींद्र पाटील यासह असंख्य गावातील तरुणवर्गासह अबालवृध्द शोभायात्रेत सहभागी झाली होते. यात घोड्यावर स्वार झालेले छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता जिजाऊ व त्यांच्या सोबत असलेले भालदार चौकदार मुघल सैनिक गागा भटृ व छोट्या टँक्टरवर वेगवेगळे महापुरुषांचे पेहेराव त्यात लोकमान्य टिळक, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद हे आरुड झालेले गावात आकर्षण बनली होते. मिरवणूकीत ढोल ताशांच्या गजरात शाळेतील मुलींच्या लेझीम पथकाने नऊवारी साडीत ठेका घेतला व ‘छत्रपती शिवाजी महाराज कि जय’च्या घोषणांनी संपूर्ण गाव निनादत होता. यावेळी शाळेच्या स्काऊटच्या विद्यार्थ्यानी स्वयंसेवक म्हणून काम चोख निभवले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बी.एन.पाटील विद्यालयातील शिक्षक आय.जे. पाटील, एन.यु. देसले, एस.बी.भोसले, ए.एस. पाटील, एस.एन. सोनवणे, संदीप पाटील, एस.जे. सैदाणे जाधव यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी नित्यानंद पाटील, संजय पाटील, सोपान पाटील, गुलाब पाटील, विनोद पाटील, तुषार पाटील यांच्या विद्यार्थी व विद्यार्थींनींनी सहभाग नोंदवला होता.
भातखंडे येथे गावातून मिरवणूक
भातखंडे । येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयात शिवजयंती तिथीनुसार मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सर्व प्रथम संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील सह संस्थेच्या भडगांव येथील लाडकुबाई माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या प्राचार्या वैशाली पाटील, प्रा.एस.व्ही. शिंदे, कमलेश शिंदे, या कार्यक्रमात गावातील प्रमुख उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळ्याचे पुजन केले नंतर उपस्थितांमध्ये संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील, वैशाली मँडम, एस.व्ही शिंदे, कमलेश शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.