चाळीसगाव । शेतमालाला हमीभाव मिळावा, शेतकर्यांचा सातबारा कोरा होऊन संपूर्ण कर्जमाफी व्हावी आदी मागण्यांसाठी शेतकर्यांनी संप पुकारला आहे. संप सुरु असून या संपला चाळीसगाव येथील सर्व पक्ष व सामाजिक संघटनांनी पाठींबा जाहीर केला आहे. यासंबंधी बैठकीचे रविवारी 4 रोजी कृउबा आयोजन करण्यात आले. सोमवारी 5 रोजी चाळीसगाव बंदची हाक देण्यात आले असून रास्ता रोको करण्यात येणार आहे. यासंबंधीचे निवेदन पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे. आज शासकीय कार्यालयाजवळ चाळीसगाव बंद करावे त्यात रेल्वे स्टेशन, सिग्नल पॉईंट, भडगाव रोड, गणेश रोड, तहसील कचेरी, घाट रोड, कृषी उत्पन्न बाजार समिती पासून रांजणगाव दरवाजा, शिवाजी घाट, भाजी मार्केट, या ठिकाणी रास्ता रोको होणार आहे.
निवेदनावर यांच्या सह्या : शेषराव पाटील, प्रमोद पाटील, दिनेश पाटील, राजेंद्र राठोड, चित्रसेन पाटील, गणेश पवार, दिलीप घोरपडे, लक्ष्मण शिरसाठ, अविनाश काकडे, रवींद्र सूर्यवंशी, अंबु पाटील, राहुल पाटील, डॉ.मंगेश वाडेकर, विवेक रणदिवे, दिनेश पाटील, संजय कापसे, सत्यजित पाटील, रामराज पाटील, जयंत देशमुख, सुभाष जैन, देवेंद्रसिंग पाटील, प्रभाकर फाटे, बाळासाहेब फाटे, प्रमोद पाटील, राजेंद्र पगार, अनिल निकम, ज्ञानेश्वर राठोड, मनोज चव्हाण, सोमनाथ माळी, परशुराम महाले, सुरेश स्वार, रवींद्र पाटील, महेंद्र पाटील, अशोक खलाने, बाजीराव दौंड, उमेश देशमुख, योगेश पाटील, संदीप पाटील, जयवंत पाटील, काशिनाथ गायकवाड, डॉ हरीश दवे आदींचे निवेदनावर सह्या आहेत.
चांगला प्रतिसाद: गेल्या 4 दिवसांपासून संपामुळे चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्यांची आवक व दुधाचा पुरवठा कमी झाला आहे. या संपात शेतकर्यांनी सहभागी व्हावे यासाठी किसान क्रांती मोर्चाचे विवेक रणदिवे व जयवंत देशमुख आदी शेतकर्यांनी आवाहन केले होते. संपाला चाळीसगाव तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे.