चाळीसगाव। संगनमत करुन शेतकर्यांची लुट करुन इतर मार्केट कमिटी पेक्षा कमी भावात कांदा खरेदी करणार्या चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापार्यांविरोधात तालुक्यातील कांदा उत्पादन करणारे शेतकर्यांनी एकत्र येत रविवारी 13 रोजी व्यापार्यांचा निषेधार्थ एक ते दिड तास बाजर समितीसमोर रास्ता रोको केला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वर शेतकर्यांनी रास्ता रोको केल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रविंद्र पाटील यांनी मध्यस्थी केल्याने शेतकर्यांनी रास्ता रोको आंदोलन थांबविले. कांद्याचे भाव कमी असतांना अचानक भाव वाढल्याने शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. बर्याच शेतकर्यांनी कमी भाव असतांना कांदा विकला व उर्वरीत शेतकरी आपला कांदा घेवुन विक्रीसाठी चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येत आहेत मात्र त्यांची काही व्यापारी लुट करीत असल्याचे दिसुन आले.
इतर ठिकाणचे दर
सुमारास कांदा लिलाव सुरु झाला तेव्हा लिलावात 1 हजार ते 1 हजार 700 चा भाव देत असल्याने शेतकर्यांनी व्यापार्यांचा विरोध केला. अमदाबाद 2 हजार 500, चांदवड 2 हजार 300, नगर 2 हजार 100, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला 2 हजार 300 रुपये लिलावात भाव देण्यात येत आहे. मात्र चाळीसगाव येथे त्यामानाने कमी र देण्यात येत असल्याने शेतकर्यांनी विरोध केला.
व्यापार्यांच्या निषेध
शेतकर्यांनी बाजार समितीच्या प्रवेशद्वारा जवळ रास्तारोको करीत व्यापार्यांचा निषेध केला. दशरथ शेलार, अरविंद शिरसाठ, नवनाथ डोंगरे, किरणसिंग राजपुत, संजय राजपुत, साहेबराव पाटील, रावसाहेब पाटील, असदखान अहमदखान, नामदेव माळी, सतीश पाटील, नंदु कुमावत, ज्ञानेश्वर कुमावत, वसंतराव कुमावत, प्रभाकर कुमावत, भाऊसाहेब डोंगरे, पंढरीनाथ पाटील, प्रदीप पाटील, वाल्मिक पाटील, विरेंद्रसिंग राजपुत आदी शेतकर्यांनी रास्तारोकोत सहभाग नोंदविला.
सभापतींचे आश्वासन
शेतकरी रास्ता रोको करत असल्याची माहिती मिळताच सभापती रविंद्र पाटील, उपसभापती महेंद्र पाटील, ज्येष्ठ संचालक प्रदिप देशमुख, माजी सभापती रमेश चव्हाण व संचालक त्या ठिकाणी आले. त्यांनी शेतकर्यांची समजूत काढत रस्त्यावर उतरुन प्रश्न सुटणार नाहीत बाजार समिती शेतकर्यांची आहे, शेतकर्यांच्या हिताचे निर्णय समिती घेण्याचे आश्वासन सभापतींनी दिल्यानंतर शेतकर्यांनी रास्तारोको थांबविला.