चाळीसगाव : परिवहन मंत्री मा.दिवाकर रावते साहेब यांच्या आदेशानुसार दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना मोफत पास वितरणाचा शुभारंभ चाळीसगाव बस स्थानकात करण्यात आला, त्यांचे स्वागत लोकनेते पप्पुदादा गुंजाळ सामाजिक प्रतिष्ठाण च्या वतीने करण्यात आले.
शासनाने राज्यातील १८० तालुक्यांत पडलेल्या पावसाच्या आकडेवारीवरून दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे़ त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य म्हणून चाळीसगाव तालुका देखील घोषित झाला असुन तालुक्यांतील तांत्रिक, व्यावसायिक, काॅलेज शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक व महाविद्यालयात ये – जा करता यावे म्हणून मोफत मासिक सवलत पास एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे म्हणून आज रोजी विद्यार्थीनी कु. योगिता सतिश पगडे व विद्यार्थी चिं. सतिश शिवाजी राठोड यांना मोफत पासेस देऊन आगार प्रमुख संदिप निकम तसेच लोकनेते पप्पुदादा गुंजाळ सामाजिक प्रतिष्ठाणचे राहुल पाटील, सचिन फुलवारी याच्या हस्ते बस स्थानकात पास देउन स्वागत करण्यात आले, या मोफत पासेस चा फायदा चाळीसगाव तालुक्यातील सुमारे 6000 (सहा हजार)विद्यार्थ्यांना होणार असुन तालुक्यातील गोरगरिब विद्यार्थ्यांना देखील आता शिक्षण घेण्यास कुठलीही अडचण येणार नाही तसेच संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थीच्या वतीने व त्यांचा पालकांच्या वतीने परिवहन मंत्री मा दिवाकर रावते साहेबांचे व परिवहन खात्याचे देखील आभार माणण्यात आले.
या मोफत पासेस वितरण कार्यक्रमाला आगार प्रमुख संदिप निकम, प्रतिष्ठाण चे राहुल पाटील, सचिन फुलवारी, सहायक पोलिस निरीक्षक श्री सोनटक्के , मनोज भोई,व्हि.आर.वाघ, सुभाष खरटमल, अरुण पिंगळे ,मनिष सैंदाने,रोशन चव्हाण, विनोद चव्हाण,राहुल म्हस्के,धिरज पवार,अजय चौधरी, चेतन कुमावत,शुभम पाटील, जितेंद्र पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.