चाळीसगाव । भारतीय संविधानाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, शिक्षण क्षेत्राचे राष्ट्रीयकरण करण्यात यावे, सर्व प्रकारचे शिक्षण सर्वांसाठी मोफत व्हावे सर्वांना आरोग्य सुविधा मोफत पुरवावी आदि मागण्यांसाठी महाराष्ट्रातील फुले- शाहु- आंबेडकरी चळवळीच्या 23 संघटनांनी एकत्र येत जाती पातीचे राजकारण न करता विविध ठराव करण्यासाठी चाळीसगाव येथे राज्यस्तरीय सामाजिक ऐक्य परिषद 2017चे आयोजन चाळीसगाव येथील लक्ष्मीनगर देवकर मळ्यात 17 सप्टेबर रोजी 1 वाजता करण्यात आले आहे. या आयोजित परीषदेस लंडन उद्योगपतीसह परराज्यातील प्रमुख अतिथी मार्गदर्शन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी भारत अभियानाचे मुख्य संयोजक धर्मभूषण बागुल यांनी येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या परिषदेत प्रमुख अतिथी म्हणून उत्तर प्रदेशच्या बहुजन सक्षमीकरण अध्यक्षा डॉ. जयश्री, दिल्लीचे नॅकडोर अध्यक्ष अशोक भारती, राजस्थानचे राष्ट्रीय मुलनिवासी संघ अध्यक्ष ताराराम मेहना हे उपस्थित राहून विविध चर्चा करण्यात येणार आहे.
ऐक्य परीषदेत यांचा राहणार सहभाग
कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून एकलव्य संघटनेच राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजी ढवळे, नॅशनॅलीस्ट नेटीव्हज फेडरेशनचे मुख्य संयोजक सुनिल भालेराव, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष राजरत्न आंबेडकर, बारा बलुतेदार महासंघ, परिषदेत एकलव्य संघटना म.रा. स्वाभीमान भारत अभियान नॅशनॅलिस्ट नेटीव्हज् फेडरेशन, भारतीय बौद्ध महासभा, राष्ट्रीय चर्मकार महासंघ, बहुजन सशक्तीकरण संघ, मातंग महाशक्ती, राष्ट्रीय बंजारा टायगर्स, अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद, अ.भा. बंजारा क्रांती दल, धनगर समाज महासंघ, भटके विमुक्त समाज महासंघ, कोळी समाज महासंघ, पारधी समाज संघटना, वैदु समाज संघटना, गोंधळी समाज संघटना, रामोशी समाज, वडार समाज संघटना, ठाकर समाज, बारा बलुतेदार महासंघ, बेलदार समाज संघटना, राजपूत समाज व वंजारी ओबीसी महासंघ संघटना सहभाग राहणार आहे.