चाळीसगाव । शिवसेनेतर्फे 26/11च्या हल्ल्यातील शहिदाना 26 रोजी शिवसेना व स्व. पप्पुदादा गुंजाळ सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने येथील सिग्नल चौकात सायंकाळी 7 वाजता आदरांजली वाहण्यात आली. चाळीसगाव शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकार्यांसह स्व.पप्पु दादा गुंजाळ सामाजिक प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांनी मुबंई येथे 26 नोव्हेंबर 2008 ला दहशद वादाच्या हल्ल्यात शहीद झालेल्यांना सामूहिक आदरांजली अर्पण केली.
यांची होती उपस्थिती
चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. विनोद कोतकर, डॉ. सुनील राजपूत, माजी शहराध्यक्ष नंदकिशोर बाविस्कर यांनी यावेळी 26/11 च्या घटनेला उजाळा देत शहिदांना आदरांजली वाहिली उपस्थितांच्या वतीने मेणबत्या पेटून शहिदाना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश चव्हाण, महेंद्र पाटील, उमेश राजपूत, रयत सेनेचे संस्थापक गणेश पवार, संभाजी सेनेचे अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ, संतोष राजपुत, दिलीप घोरपडे, तुषार खेडकर, संदीप राजपूत, दिनेश विसपुते, डॉ. राजेंद्र तलरेजा, मोतीलाल चौधरी, सागर चौधरी आदी उपस्थित होते.