चाळीसगावात स्त्री अर्भकाला सोडून मातेचे पलायन

0

चाळीसगाव– शहरातील काँग्रेसवाडी भागातील गटारीत एक दिवसीय स्त्री जातीच्या अर्भकाला टाकून मातेने पलायन केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. या प्रकाराने खळबळ उडाली. हवालदार शशीकांत पाटील, मयुरी पाटील यांनी पंचनामा केला तर स्त्री अर्भकाला चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकाराबाबत अज्ञात मातेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.