चाळीसगावात हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश

0

‘चला आनंद लुटू या’ कार्यक्रम
विधवा महिलांचे विमा उतरवून सन्मान
उमंग समाजशिल्पी महिला परिवारचा उपक्रम
महिलांचे धम्माल कला सादरीकरण
चाळीसगाव – येथील उन्मेश पाटील प्रेरित उमंग समाजशिल्पी महिला परिवाराचा दरवर्षीप्रमाणे यंदाचा ‘चला आनंद लुटू या’ महिला सांस्कृतिक कार्यक्रम व स्वंय संजीवनी सन्मान सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. उमंग परिवाराकडून संक्रांत सण विचारांचे, आरोग्याचे व आनंदाचे वाण लुटून साजरा करण्यात येतो. गेल्या दहा वर्षापासून उमंग महिला परिवार विधवा महिलांचे हळदीकुंकू व विमा उतरवून सन्मान करून यावर्षी हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक म्हणून ‘विविधतेतून एकता’ या संदेशातून मुस्लिम महिलांना तिळगुळ समारंभात सहभागी करून त्यांचा देखील विमा काढून सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमासाठी यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमासाठी संस्थापिका अध्यक्षा संपदा पाटील, अध्यक्षा सुवर्णा राजपूत, समन्वयिका विजया पाटील, सांस्कृतिक कार्यक्रम नियोजन समितीच्या प्रमुख माधुरी वाघ, प्रतिभा पाटील, कविता पाटील, कल्पना पाखले, राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, पं.स. सभापती स्मितल बोरसे, कविता मानोरकर, नगरसेविका संगीता गवळी, विजया पवार, जयश्री पाटील भारती पाटील यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे अध्यक्ष व विविध गावांचे महिला, सरपंच बेबाबाई मोरे, पुष्पांजली पवार, पत्रकार, नगरसेवकांच्या सौभाग्यवती उपस्थित होत्या.

ढोल वाजवून उपस्थित मंत्रमुग्ध
उमंग परिवाराने सुरु केलेल्या ढोल पथकाच्या प्रशिक्षनार्थ्यानी कार्यक्रमात ढोल वाजवून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमात सांस्कृतिक कलागुणांचे सादरीकरण करतांना सोलो डान्स ग्रुप डान्स तसेच प्लास्टिक बंदीवर मनिषा मालपुरे यांनी नाटिका सादर केली. मोहिनी कापडणीस, योजना पाटील, सुप्रिया कुलकर्णी, शैला राजपूत, पूनम शर्मा, रुपाली निकुंभ, शितल देशमुख, रेणुका शर्मा, विशाखा राठोड, कीर्ती खैरनार, माधुरी एंडके, डॉ. क्रांती देसले, निधीताई, साधना पाटील तसेच एंजल ग्रुप, स्वामिनी ग्रुप, खंडोबा ग्रुप, एकता ग्रुप, आय सी डी सी ग्रुप, उमंग ग्रुप यांनी नृत्याचे सादरीकरण केले. तसेच रेखा जोशी यांच्या धमाकेदार नृत्याने कार्यक्रमातील सर्व महिलांनी मनसोक्त आनंद लुटला.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
यावेळी कर्तव्य बचत गटाच्या अध्यक्षा सरला येवले व सचिव सुचिता गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात संपदाताई पाटील व दामिनी वाघ यांनी गीत गावून कार्यक्रमाचा आनंद घेतला. कोअर ग्रुप सदस्या ज्योती पाटील, महानंदा पटद्कल मेनका जंगम, रत्नप्रभा नेरकर, उज्वला अमृतकार, ललिता पिंगळे, माधवी नागरे, आरस्ता माळतकर मनीषा शेजवलकर, कल्पिता पवार, माधवी पाटील, रेखा जोशी, अर्चना निकुंभ, सोनल वाघ, सारिका जैन, विजया पाटील, दामिनी वाघ यांनी अनमोल सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेख सर, सुहास पवार, अर्जुन पाटील, भगवान बच्छे, नंदू पाटील, सुभाष ठाकरे, यांनी विशेष परिश्रम घेतले.