– नववर्षाचे आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वागत
– दिव्यांग भगिनींना दिला आनंद
चाळीसगाव – शहरातील हिरकणी महिला मंडळाच्या वतीने दिव्यांग भगिनींच्या स्वयंदिप फाउंडेशन कार्यालयात मध्यरात्रीच्या सुमारास नववर्षाचे स्वागत करण्यात आले. यावेळी दिव्यांग भगिनींसोबत घेऊन हिरकणी महिला मंडळ व युगंधरा फाउंडेशनच्या महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित गाण्यांच्या तालावर नृत्य सादर करीत दिव्यांगांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
यांची होती उपस्थिती
हिरकणी महिला मंडळाच्या वतीने दिव्यांग भगीनीं चे स्वागत करण्यात आले यांचा आम्हास आनंद होत असल्याची भावना मीनाक्षी निकम यांनी व्यक्त केली. यावेळी स्मिता बच्छाव, वैष्णवी हिरे, सुचित्रा पाटील, मिनाक्षी निकम, प्रीती रघुवंशी, सोनल साळुंखे, योगिता राजपूत, शितल शितोळे, सविता राजपूत, लता जाधव, संध्या राजपूत, अनिता शर्मा, मनिषा राजपूत, छाया राजपूत, राखी राजपूत, छाया पाटील, वंदना सूर्यवंशी, आशा शिरसाठ, वैष्णवी पाटील, गीता पाटील, पूजा लदे, संजीवनी लदे, कविता परमार, छाया राजपूत, साधना राजपूत, स्मिता पाटील, मनीषा राजपूत, यामिनी राजपूत, भारती राजपूत, मनीषा राजपूत, शैला पवार, मीना भोसले, विद्या कोतकर आदी महिला, मुले मुली मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.