चाळीसगावात ‘हॅपी म्युझीक शो’च्या माध्यमातून एचआयव्हीबाबत जनजागृती

0

चाळीसगाव। एचआयव्ही ग्रस्त मुलांसाठी कार्य करणारे प्रा.रवि बापटले यांनी हॅपी म्युझिक शोच्या माध्यमातून समाजात एचआयव्हीची जागृती व समाजाने करावयाचे सहकार्य सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यामातून समाजासमोर मांडत आहेत असे रोटरी एनक्लेव्ह प्रेसिडेंट प्रमुख डॉ. सुनिल राजपूत प्रोजेक्ट कॉ-ऑडीनेटर डॉ. संतोष मालपुरे व प्रोजेक्ट चेअरमन राहुल वाकलकर यांनी अशी माहीती पत्रकार परिषदेत दिली आहे. चाळीसगावात प्रथमच हॅपी म्युझीक शोचे आयोजन करून एचआयव्ही ग्रस्त बालकांसाठी रवि बापटले यांच्या लातुर जिल्ह्यातील हासेगाव येथील सेवालय या संस्थेला सहकार्य केले जात आहे. रवि बापटले यांच्या एचआयव्ही संदर्भात कार्याबल रोटरॅक्ट क्लब हातभार लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. या क्लबला चाळीसगावातील सर्व रोटरी क्लब सहकार्य करीत आहेत.

पत्रकार परीषदेतून नागरीकांना उपस्थितीचे केले आवाहन
पत्रकार परिषदेच्या माध्यमातून चाळीसगाव परिसरातील जनतेला आवाहन करण्यात आले आहे कि, आपल्या परिने आर्थिक सहकार्य करून 29 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता सिताराम पहेलवान यांच्या मळ्यात उपस्थित रहावे. आपल्या उपस्थितीने त्यांच्या दुर्देम्य ईच्छाशक्तीला बळ दिले जाऊ शकते. अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. बापट यांच्या सेवालयाच्या माध्यमातून 66 मुले दत्तक घेण्यात आले असून त्यांना शाळा व त्यांना पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी ते लोकसहभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर हा शो करीत असून त्यांना आज पावेतो अनेक पुरस्कार मिळाले आहेत. प्रत्येक एचआयव्ही मुल हे सर्वसामान्य मुलांसारखे जगले पाहीजे. असे बापटले यांचे स्वप्न असुन त्यांचे पुर्नवसन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

यांची होती उपस्थिती
या भावनेतून मुलांकडे पाहावे अशी त्यांची भावना आहे म्हणून त्यांनी अविवाहीत राहून फक्त मुलांसाठी आपले आयुष्य सेवालयासाठी सर्मपीत केले आहे. यावेळी पत्रकार परिषदेसाठी रोटरॅक्ट क्लबचे चित्रसेन पाटील, राहुल पाटील, कुलदीप चौधरी, आतिष कदम, किशन चौधरी, अक्षय कापडणे, अंकिता इसराणी, सुरभी करवा, दिपक पाटील, माधुरी जाधव, तक्षक ठोंबरे हे कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते.