चाळीसगाव : ऑक्टोबर महिन्यात महावितरणने चाळीसगावात ६८ वीजचोरांवर कारवाई केली आहे.
हे देखील वाचा
महावितरणच्या शहर उपविभागीय कार्यालयाने मोहीम राबवून जवळपास ४५ ग्राहकांवर कारवाई करून ७३०२८ युनिटचे ग्राहकांकडून १२ लाख ७७ हजार ७८७ रुपये भरून घेतले आहेत.
तसेच वीजचोरीला आळा घालण्यासाठी चाळीसगाव विभागीय स्तरावर स्थापन केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने २३ ग्राहकांकडून ५५३३८ यूनिटचे ९ लाख ८६ हजार ३० लाख रुपये वसूल केले आहेत. चाळीसगावात एकूण ६८ ग्राहकांकडून १२८३६६ युनिटची २२ लाख ६३ हजार ८१७ रुपयांची वीजचोरी पकडण्यात आली आहे. दरम्यान, ग्राहकांनी अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.