कु.राजेश्वरी जाधव हिच्या चतुर्थ स्मृतीदिनानिमित्त आयोजन
चाळीसगाव । कु.राजेश्वरी जाधव हिच्या स्मृतीदिनानिमित्त शहरातील 0 ते 14 वयोगटातील बालकांसाठी त्वचारोग तपासणी व निदान शिबिराचे आयोजन रामचंद्र जाधव व मित्र परिवाराने 24 जुलै 2018 मंगळवार रोजी हिरापूर रोडवरील असलेले बापजी जीवनदीप मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मोफत शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. पालकांनी मुलांना सोबत घेवून यावे व जूनी फाईलस असल्यास सोबत आणण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. शिबीरात नामवंत त्वचारोग तज्ञ डॉ.राहुलजी शिंदे, डॉ.अभिषेकजी पाटील, डॉ.धर्मराज राजपूत, डॉ.राहुल कुरकुरे, डॉ.प्रमोद ओस्तवाल, डॉ.भूषण राजपूत, डॉ.चेतन साळुंखे, डॉ. विद्या मोरे हे बालकांमधील इसब, चेहर्यावरील डाग, कुष्टरोग, वांग, खड्डे, गोवर, कांजण्या, अॅलर्जी, अंगावर पित्त उसळणे, टक्कल पडणे व त्वचारोग संबंधीत विविध आजार तपासणी व निदान करण्यात येणार आहे.
यांचेही सहकार्य लाभणार
डॉ.प्रशांत शिनकर, डॉ.शैलेंद्र सूर्यवंशी, डॉ. चंदा राजपूत, डॉ.शशिकांत राणा, डॉ.योगेश पोतदार, डॉ.हरीश राजानी, डॉ.विवेक बोरसे, तसेच डॉ.सुनील राजपूत, डॉ.संदीप देशमुख, डॉ.बी.पी.बाविस्कर, डॉ.नरेंद्रसिंग राजपूत, डॉ.प्रमोद सोनवणे यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे तरी गरजूंनी या बालत्वचारोग शिबीराचा लाभ घ्यावा, असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे.