चाळीसगाव – ई-फार्मसीच्या विरोधात औषध विक्रेत्यांनी पुकारलेल्या एक दिवसीय बंदला चाळीसगाव तालुक्यातील सुमारे २२५ रिटेल मेडिकल स्टोअर्स व २३ होलसेलर यांनी जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांच्या नेतृत्वाखाली बंदमध्ये सामील होऊन शंभर टक्के बंद दुपारी तीन वाजेपर्यंत यशस्वी केला. यात सेंट्रल झोनचे कार्यकारणी सदस्य संदीप बेदमुथा तालुकाध्यक्ष योगेश भोकरे, उपाध्यक्ष विनोद आचालिया, सचिव प्रेमसिंग राजपूत, खजिनदार महेश येवले, योगेश येवले, एकनाथ पाटील, महेश कुमट, प्रशांत मालू, संजय ब्राह्मणकर, मंगेश महाजन,निशांत पाटील, पुष्पा चौधरी कार्यकारणी सदस्य यांनी बंद यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.