चाळीसगावी जहागीरदारवाडीत घरफोडी

0

रोख रकमेसह एक लाख 90 हजाराचा ऐवज चोरी
चाळीसगाव । घरी कोणी नसल्याचा फायदा घेवुन बंद घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडुन घरात लोखडी बॉक्स मध्ये ठेवलेले रुपये रोख, सोन्याची पोत असा एकूण एक लाख 90 हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना 1 जानेवारी रोजी दुपारी 1.30 ते 3 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेदरम्यान घडली असुन 3 रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला.
आहे.

प्राप्त माहिती नुसार जयाबाई वाल्मिक पाटील (वय- 29) रा. सप्तश्रुंगी नगर, बाबाजी चौक जहागीरदारवाडी चाळीसगाव यांच्या आजी मयत झाल्याने त्या परीवारासह 1 जानेवारी रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास घराला कुलुप लावुन राधागीर ता.एरंडोल येथे अंत्यविधीसाठी गेल्या होत्या. तेव्हापासून 3 जानेवारीपर्यंत त्या तेथेच होत्या 3 रोजी त्यांच्या शेजार्‍याने त्यांच्या घराचा कडी कोयंडा तुटुन पडला असल्याची माहिती त्यांना दिल्यावरुन त्या सकाळी घरी आल्या तेव्हा त्यांच्या घरातील हॉल मध्ये सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले व हॉल मध्ये ठेवलेला लोखंडी बॉक्स दिसला नाही त्यात एक लाख 30 हजार रुपये रोख व 60 हजार रुपये किमतीची 30 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत होती त्यांनी आजु बाजुला शोध घेतला असता सदर लोखंडी बॉक्स घराच्या मागे मक्याच्या शेतात रिकामा सापडला त्यातील मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी दिनांक 1 जानेवारी रोजी दुपारी 1-30 ते दिनांक 3 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान घराचा कडी कोयंडा तोडुन चोरुन नेला आहे याप्रकरणी त्यांनी दिनांक 3 जानेवारी रोजी फिर्याद दिल्यावरुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पो उ नि राजेश घोळवे करीत आहेत. दरम्यान जळगाव येथील श्वान पथक व फिंगर प्रिंट पथकाला पाचारण करण्यात आले होते रात्री उशीरापर्यंत सदर पथके चाळीसगाव येथे घटनास्थळी दाखल झाले नव्हते.